IPL Auction 2025 Live

Madhya Pradesh Crime: उज्जैनमध्ये सहकार्याची हत्या, हॉटेल कर्मचाऱ्याला अटक

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे एका हॉटेल कर्मचाऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

Madhya Pradesh Crime:  मध्य प्रदेशातील (Madya Pradesh) उज्जैन येथे एका हॉटेल कर्मचाऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका खासगी हॉटेलमधील कर्मचाऱ्याच्या संशयास्पद मृत्यू (Death) प्रकरणी देवासगेट पोलिस स्टेशनमध्ये तपास सुरु करण्यात आला आहे. या प्रकरणी हॉटेल मधील एका कर्मचाऱ्याला त्याच्या सहकाऱ्याची हत्या केल्या प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज ही समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैन येथील देवासगेट क्रॉसरोड येथील हॉटेल बॉम्बे स्वीट्सचा कर्मचाऱ्याची हत्या झाली होती. हत्येत मृत्य झालेल्या व्यक्तीचे नाव नरेश केवट आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत चौकशी सुरु केली. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तपासात असे आढळून नरेश हा सहकारी लक्ष्मीनारायण गोमे आणि राहूल उर्फ अभिषेक जैन यांच्या सोबत होता. 31 डिसेंबर 2023 रोजी रात्री 10.30 वाजता जेवण आणि दारू पिऊन हॉटेल बंद करून हॉटेलच्या वरच्या हॉलमध्ये झोपले होते. (हेही वाचा-  रस्ता ओलांडताना ट्रकने तरुणाला चिरडले, अति धुक्यांमुळे अपघात)

रात्री बाराच्या सुमारासा राहुलने नरेश केवट यांना लोखंडी रोडने मारहाण करण्यास सुरुवात केली. लक्ष्मीनारायण यांनी मारहाण करण्यास नकार दिल्यावर राहुलने त्यांना धमकी दिली. राहुलने नरेशला मारहाण केली. या जीवघेण्या मारहाणीत नरेशचा जागीच मृत्यू झाला. हॉटेलच्या खोलीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपुर्ण घटना कैद झाली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला. आरोपी राहुलला शनिवारी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्याबाबत आरोपीकडे चौकशी केली असता, घटनेच्या दिवशी नरेश हा अश्लील वर्तन करत असल्याचे त्याने सांगितले. या कारणावरून त्याने नरेशचा खून केला. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले लोखंडी रोड देखील जप्त करण्यात आले आहे.