बिहारमधील मुजफ्फरपुर येथे 20 वर्षीय तरूणाची निर्घृण हत्या; आरोपीने साखळीने बांधलेला मृतदेह एअरबॅगमध्ये भरून फेकला पाण्यात

यानंतर, मृतदेह एअरबॅगमध्ये बंद करून पाण्यात फेकला गेला. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यातील मृतदेह काढला. यावेळी मृतदेह एअरबॅगमध्ये साखळ्यांनी बांधलेल्या अवस्थेत सापडला. तसेच मृत तरुणाच्या शरीरावर अनेक ठिकाणी चाकूने जखमा झाल्याचे निशाणदेखील पोलिसांना यावेळी आढळून आले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला असून शनिवारी संध्याकाळी उशिरा मृताची ओळख पटली.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

बिहारमधील (Bihar) मुजफ्फरपुर (Muzaffarpur) येथील सकरा येथे एका 20 वर्षीय तरूणाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली. यानंतर, मृतदेह एअरबॅगमध्ये बंद करून पाण्यात फेकला गेला. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यातील मृतदेह काढला. यावेळी मृतदेह एअरबॅगमध्ये साखळ्यांनी बांधलेल्या अवस्थेत सापडला. तसेच मृत तरुणाच्या शरीरावर अनेक ठिकाणी चाकूने जखमा झाल्याचे निशाणदेखील पोलिसांना यावेळी आढळून आले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला असून शनिवारी संध्याकाळी उशिरा मृताची ओळख पटली. दरम्यान, शनिवारी मुजफ्फरपूर सकरा पोलिस स्टेशन परिसरातील बघनगरीच्या भुट्टा चौकाजवळ मृतदेह सापडला होता. सुरज कुमार, असं या मृत तरुणाचं नाव आहे.

सुरज हा अहियापुर पोलिस स्टेशन परिसरातील आयची गावात राहणाऱ्या नौदलातून निवृत्त झालेल्या अखिलेश कुमार यांचा मुलगा होता. सुरजच्या कुटुंबियांनी सांगितलं की, मित्रासोबत गेल्यानंतर तो घरी परतलाचं नाही. कुटुंबीयांनी त्याचा रात्रभर शोध घेतला, परंतु, त्याच्याविषयी कोणतीही माहिती मिळू शकली नाही. (हेही वाचा - बलात्काराच्या घटनांमध्ये भारतातील 'हे' 10 राज्य आहेत अतिशय घातक; राजस्थानमध्ये सर्वाधिक भयानक परिस्थिती, तर महाराष्ट्रात 55 टक्क्यांनी वाढलेत बलात्कार प्रकरणं)

सुरज बेपत्ता झाल्याची माहिती देण्यासाठी हे कुटुंब अहियापूर पोलिस ठाण्यात जात होते. त्यावेळी गस्ती पोलिसांनी पोलिस स्टेशनच्या वाटेवर पाणी असल्याचे सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता सुरज हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर काही वेळात कुटुंबियांना पोलिसांचा फोन आला की, एसकेएमसीएच येथे अज्ञात युवकाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी आला आहे. कुटुंबीयांनी पोस्टमॉर्टम हाऊस गाठले. त्यानंतर सुरजच्या मृतदेहाची ओळख पटली. (वाचा - UP BJP Leader Arrested In Gangrape Case: विद्यार्थीनिवर सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजप नेता डॉ. श्याम प्रकाश द्विवेदी याला अटक)

सुरजच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, सुरजला त्याच्या मित्राने बोलावले होते. दुपारी तीननंतर कुटुंबियांनी सुरजला फोन केला होता. परंतु, सुरजने फोन उचलला नाही. त्यानंतर सुरजचा फोन बंद होता. सुरजला घराबाहेर बोलावून त्याच्या मित्रांनी त्याची हत्या केली, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे.