तबलीगी मरकज हा तालिबानी गुन्हा... केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी व्यक्त केला तीव्र निषेध

या प्रकारावर मोदी सरकारमधील केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार माफीच्या लायक नसून “तालिबानी जुर्म”असल्याचं म्हटलं आहे.

MA Naqvi। Photo Credits: Twitter / ANI

दिल्लीमध्ये निजामुद्दीन येथे तबलिगी समाजाच्या सामुहिक धार्मिक कार्यक्रमामध्ये अनेक लोक जमा झाल्याने देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या प्रकारावर मोदी सरकारमधील केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार माफीच्या लायक नसून “तालिबानी जुर्म”असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. जेव्हा संपूर्ण भारत देश एकजुटीने कोरोना व्हायरस संकटाचा सामना करत आहे तेव्हा अशा' गंभीर गुन्ह्याला' माफ केले जाऊ शकत नाही. हा हलगर्जीपणा नसून 'गंभीर अपराधाचा' प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तबलिगी जमातीच्या या सामुहिक धार्मिक कार्यक्रमात लॉकडाऊनच्या काळात सुमारे 3000 लोकं एकत्र जमल्याचं समजल्यानंतर तात्काळ इमारत रिकामी करून संबंधितांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर लोकं आपापल्या मूळगावी परतली त्यामुळे आता कोरोना व्हायरसचा धोका अधिक बळावला आहे. मात्र स्थानिक पोलिसांकडून संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वारंटीन करण्याचे आदेश आहेत. सोबतच या प्रकरणी केंद्राने अहवाल मागवून संबंधितांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. Coronavirus: दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या पुण्यातील 60 नागरिकांना क्वारंटाइनचा सल्ला

मुख्तार अब्बास नकवी यांचे ट्वीट

चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरस आता जगभर थैमान घालत आहे. इटली, स्पेन पाठोपाठ आता अमेरिकेमध्ये सध्या कोरोना व्हायरस संसर्गातून मृत्यूचे तांडव सुरू आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1397 च्या पार गेला आहे तर मृत्यूमुखी पडणार्‍यांचा आकडा 45 पर्यंत पोहचला आहे. तर कोरोनावर 124 पेक्षा अधिक लोकांनी मात केली आहे.