Madya Pardesh Fire News: केमिकल फॅक्टरीला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही, मध्ये प्रदेशातील घटना
ग्वाल्हेरमधील बाराघाटा इंडस्ट्रियल एरिया येथे एका केमिकल कारखान्यात भीषण आग लागली.या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही,
Madya Pardesh Fire News: दोन दिवसांपुर्वी अमृसतर येथील एका फॅक्टरीला आग (Fire) लागली होती. त्या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता.ही घटना ताजी असताना ग्वाल्हेरमधील बाराघाटा इंडस्ट्रियल एरिया येथे एका केमिकल कारखान्यात भीषण आग लागली. काही वेळातच आगीने संपूर्ण कारखान्याला जाळून खाक केले. कॅम्पसमध्ये सिगारेट पेटवल्यानंतर कोणीतरी अर्धवट जळणारी माचिस फेकली, ज्यामुळे हा आग एका बॉक्सला लागली. त्यामुळे तेथील सर्व वस्तू जळल्या आगीने लगेच पेट घेत संपुर्ण कारखान्याला आगल पेटली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे.
आगीची माहिती मिळताच, पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी आल्या. आग पूर्णपणे विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना सुमारे पाच तास लागले. जवानांचे शर्तीचे काम सुरु होते.
अग्निशमन अधिकारी अतिबल सिंह यादव सांगितले की, माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आल्या आणि आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आत छोटी आग लागली आहे, ती विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, सिगारेट ओढल्यानंतर माचिसची काठी सोडल्याने ही जाळपोळ झाल्याची शक्यता वर्तवली आहे. तर या भीषण आगीत कारखाना जळून खाक झाला आहे.