IPL Auction 2025 Live

Loudspeaker Row: उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरून 45 हजारांहून अधिक लाऊडस्पीकर हटवले, 58 हजार आवाज कमी

त्यानंतर आतापर्यंत धार्मिक स्थळांवरून 45 हजारांहून अधिक लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत.

Loudspeaker | Representational Image (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातून गेल्यानंतर लाऊडस्पीकरचा वाद (Loudspeaker Controversy) प्रथम उत्तर प्रदेशात (UP) पोहोचला. येथे यापूर्वी सीएम योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath यांनी याबाबत अनेक मार्गदर्शक तत्त्वे दिली आणि परवानगीशिवाय लाऊडस्पीकर काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आतापर्यंत धार्मिक स्थळांवरून 45 हजारांहून अधिक लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत. या संदर्भात 23 एप्रिल रोजी आदेशाची अधिसूचनाही जारी करण्यात आली होती, त्यानंतर पोलीस कारवाईत आले आणि यूपीच्या विविध जिल्ह्यांमध्ये सातत्याने मोहीम राबवून धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले जात आहेत. याशिवाय आतापर्यंत 58 हजार 861 लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश

सुप्रीम कोर्टाने ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी अंमलबजावणी सुरू आहे. बिहारमध्येही राजकारण तापले आहे. काही धर्माचे लोक याला विरोध करत आहेत. दरम्यान, गुरुद्वारा व्यवस्थापनाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. (हे देखील वाचा: PM-CM Meeting मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सह बिगर भाजप शासित राज्यांना सुनवलं; Petrol Diesel Price कमी करण्यासाठी दिला सल्ला)

गुरुद्वाराच्या घुमटावरील मोठा लाऊडस्पीकर व्यवस्थापनाने काढून टाकला आहे. या स्पीकरवरून चौक पोलीस ठाण्याव्यतिरिक्त चांदोरिया, चौक व परिसरातील अनेक भागात गुरुवाणीचा आवाज पोहोचत असे. पण आता गुरुवाणी फक्त गुरुद्वारा कॅम्पसमध्येच ऐकायला मिळते.