Monsoon 2020 Updates: पूर्व-मध्य अरबी समुद्रात नवा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई आणि केरळात येत्या 8-9 जूनपासून पावसाचा जोर वाढणार-IMD
त्यामुळे मुंबई (Mumbai) आणि केरळात (Kerala) येत्या 8 किंवा 9 जून पासून पाऊस वाढण्याची शक्यता आयएमडीचे (IMD) मुख्याधिकारी राजेंद्र कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
येत्या 24 तासात पावसाची प्रमाण कमी होणार आहे. परंतु वायव्य भारतात तापमान वाढण्याची शक्यता आहे. खासकरुन दिल्लीत आणि 11 जून पर्यंत पाऊस पडणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पण येत्या 12 जून पासून वायव्य भारतात पावसाला सुरुवात होणार होणार असल्याचे राजेंद्र कुमार यांनी म्हटले आहे.तसेच कमी दाबाचा पट्टा येत्या 12 किंवा 13 जूनला वायव्य दिशेने ओडिशाच्या किनाऱ्याकडे वळणार आहे. त्यानंतर 12 जूनला मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता आहे. याचा प्रभाव पडल्यामुळे ओडिशासह पूर्व किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे आयएमडी कडून स्पष्ट करण्यात आले आहे.(Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळाचा पुण्याला तडाखा; मायलेकासह 4 जणांचा मृत्यू)
दरम्यान आता अम्फान, निसर्ग चक्रीवादळानंतर यापुढे 'गती' नावाचे चक्रीवादळ येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर निसर्ग चक्रीवादळामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच ज्या ठिकाणी निसर्ग चक्रीवादळाचा धोका संभावणार होता तेथील किनारपट्टीवरील गावातील नागरिकांना एनडीआरफच्या जवानांकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. मात्र निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईवरील धोका टळल्याचे ही दिसून आले होते.