Dehradun Shocker: मोलकरीण मुलीचा फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी मालकाला घेतले ताब्यात, डेहराडून येथे खळबळ

आमदाराच्या फ्लॅटच्या बाथरुममध्ये एका १५ वर्षीय मुलीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे.

Dehradun PC TWITTER

Dehradun Shocker: डेहराडूनमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. फ्लॅटच्या बाथरुममध्ये एका 15 वर्षीय मुलीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. मुलीची हत्या झाल्याचे संशय व्यक्त केला जात आहे. हत्येच्या संशयावरून संतप्त जमावांनी फ्लॅट मालकाला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. तसेच फ्लॅट मालक विक्रम लुथरा याच्या विरोधात खून आणि POCSO कायद्याचा गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा- हिमाचल प्रदेशचे मख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी फेटाळले राजीनाम्याचे वृत्त)

मिळालेल्या माहितीनुसार, डेहराडूनच्या रेसकोर्स परिसरात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. याच परिसरात काही अंतरावर एका आमदाराचे फ्लॅटदेखील आहे. पोलिसांना मुलीच्या मृत्यूची माहिती देताच, घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत मुलगी फ्लॅटमध्ये काही महिन्यांपासून मोलकरीन म्हणून काम करत होती. मृत मुलीच्या कुटुंबियांनी दावा केला आहे की, फ्लॅटच्या  मालकानी मुलीची हत्या केली आहे. तिला यापूर्वी फ्लॅट मालकाने बेल्टने मारहाण केली.

मुलीच्या  मृत्यूची माहिती परिसरात कळताच, संतप्त जमावाने फ्लॅट मालकाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.