Wheat Flour Price: मोदी सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा! आता बाजारभावापेक्षा 21 रुपये किलोने स्वस्त मिळणार गव्हाचं पीठ

सुमारे तीन लाख टन गहू या संस्थांना OMSS अंतर्गत ई-लिलावाशिवाय धान्याचे पिठात रूपांतर करण्यासाठी आणि 29.50 रुपये प्रति किलो दराने विकण्यासाठी दिले जात आहे.

Wheat Flour (PC - Pixabay)

Wheat Flour Price: गव्हाच्या पिठाच्या (Wheat Flour) वाढत्या किमतींपासून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारपासून गव्हाचे पीठ 29.50 रुपये प्रतिकिलो दराने विकण्यास सुरुवात केली आहे. तर सहकारी संस्था नाफेड आणि NCCF 6 फेब्रुवारीपासून देशभरात एकाच दराने पीठ विकणार आहेत. अन्न मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

या संस्थांनी गव्हाचे पीठ 'भारत आटा' किंवा 'इतर कोणतेही योग्य नाव' म्हणून ब्रँड करण्यास सहमती दर्शविली आहे. ज्याची कमाल किरकोळ किंमत 29.50 रुपये प्रति किलो आहे, असे एका निवेदनात म्हटले आहे. देशांतर्गत बाजारात खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत (OMSS) बफर स्टॉकमधून 30 लाख टन गव्हाच्या विक्रीच्या प्रगतीबाबत अन्न सचिव संजीव चोप्रा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत यासंदर्भात माहिती देण्यात आली. (हेही वाचा -Amul Milk Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा झटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, आता 3 रुपयांनी महाग मिळणार अमूल फुल क्रीम दुध)

मंत्रालयाने सांगितले की, केंद्रीय भंडारने आजपासूनच 29.50 रुपये प्रति किलोने पीठ विकण्यास सुरुवात केली आहे. तथापि, NCCF आणि Nafed 6 फेब्रुवारीपासून 29.50 रुपये प्रतिकिलो दराने पीठ पुरवणार आहेत. या संस्थांद्वारे विकल्या जाणार्‍या गव्हाच्या पिठाची एमआरपी किंवा कमाल किरकोळ किंमत सध्याच्या सरासरी अखिल भारतीय किरकोळ किंमत 38 रुपये प्रति किलोपेक्षा कमी आहे. सुमारे तीन लाख टन गहू या संस्थांना OMSS अंतर्गत ई-लिलावाशिवाय धान्याचे पिठात रूपांतर करण्यासाठी आणि 29.50 रुपये प्रति किलो दराने विकण्यासाठी दिले जात आहे.

यापैकी प्रत्येकी एक लाख टन अनुक्रमे केंद्रीय भंडार आणि नाफेडला, तर 50,000 टन एनसीसीएफला वाटप करण्यात आले आहे. भारतीय खाद्य निगम (FCI), केंद्रीय भंडार, नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ लिमिटेड (NCCF) चे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांत देशांतर्गत उत्पादनात घट झाल्यामुळे देशात गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती वाढल्या आहेत.