Mobile Internet Closed In Poonch: पुंछ आणि राजौरीमध्ये मोबाईल इंटरनेट बंद, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू

तेव्हापासून या भागात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे. गुरुवारी संध्याकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे चार जवान शहीद झाले तर तीन जण जखमी झाले.

search operation to nab terrorists started (PC - ANI)

Mobile Internet Closed In Poonch: जम्मू-काश्मीरच्या पुंछ (Poonch) आणि राजौरी (Rajouri) मध्ये आजपासून इंटरनेट बंद (Mobile Internet Closed) करण्यात आले आहे. गुरूवारी राजौरी सेक्टरच्या डेरा की गलीच्या जंगलात दहशतवाद्यांनी (Terrorists) लष्कराच्या चार जवानांची हत्या केली होती. तेव्हापासून या भागात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे. गुरुवारी संध्याकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे चार जवान शहीद झाले तर तीन जण जखमी झाले. आता शोध मोहिमेदरम्यान पुंछ आणि राजौरीमध्ये मोबाईल इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

एवढ्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी शुक्रवारी या भागातील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, परिसराची हवाई निगराणीही केली जात आहे आणि दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकही तैनात करण्यात आले आहे. (हेही वाचा -Army Vehicle Attacked By Terrorists: जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्यात 3 जवान शहीद)

एका अधिकाऱ्याने सांगितले की, रात्री परिसरात घेराव घातल्यानंतर आज सकाळपासून मोठ्या प्रमाणावर घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू झाली आहे. गोळीबारात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी या भागात अतिरिक्त सुरक्षा दलही तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (हेही वाचा - Rajouri Terror Attack: थानमंडी परिसरात दहशतवाद्यांकडून दोन लष्करी वाहनांवर हल्ला, चार जवान शहीद)

पहा व्हिडिओ - 

दहशतवाद्यांच्या लष्कराच्या वाहनावर हल्ला -

गुरुवारी सशस्त्र दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला होता. तीन ते चार सशस्त्र दहशतवाद्यांनी पर्वतांवरून लष्कराच्या वाहनांना लक्ष्य करण्यासाठी या भागाची निवड केल्याचे समजते. अधिकार्‍यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी जवानांची शस्त्रेही लुटले. गेल्या दोन महिन्यांतील या भागातील ही दुसरी घटना असल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या दोन वर्षात येथे 35 जवान शहीद झाले आहेत.