मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांची भेट, ईव्हीएमवर चर्चा होण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) येत्या गुरुवारी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या दिल्लीत भेट घेणार आहे
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) येत्या गुरुवारी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या दिल्लीत भेट घेणार आहे. ही भेट ईव्हीएम संदर्भात असेल असे टीव्ही 9 च्या सूत्रांनुसार सांगण्यात येतय. याआधी राज ठाकरे हे ईव्हीएम मुद्द्यावर बोलाण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी दिल्लीत गेले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.
त्यात आता पुन्हा एकदा दिल्लीत जाऊन ते ममता बॅनर्जींशी या विषयावर बोलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ईव्हीएमविरोधातल्या आंदोलनासाठी म्हणून चर्चा त्या प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भेटतील.
हेही वाचा- Lok Sabha Election 2019: घड्याळाचं बटण दाबलं तरीही कमळाला मत गेल्याचं मी डोळ्यानं पाहिलं-शरद पवार
राज ठाकरे यांचा चेहरा हा मोदीविरोधी प्रखर चेहरा म्हणून ओळखला गेला. राज ठाकरे हा मोदी विरोधी आणि अमित शहा विरोधी केवळ राज्यात नव्हे तर राज्यभरात चर्चेचा विषय ठरले होते. त्यामुळे ईव्हीएम या मुद्दयांवर या विरोधी पक्षांची चर्चा ही खूप महत्त्वाची असेल असे सांगण्यात येत आहे.
आता राज ठाकरेंना आपला मोर्चा हा ईव्हीएम विरोधात वळवला असून, लवकरच यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी ती ममता बॅनर्जींना भेटणार असल्याचे सांगण्यात येत आहे.