Madhya Pradesh Shocker: बाळाच्या रडण्यामुळे संतापलेल्या अल्पवयीन आईने केली अडीच महिन्यांच्या मुलाची हत्या

त्यानंतर कुटुंबीयांनी मुलच्या बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती. पोलिसांना अल्पवयीन मुलगी सापडली तेव्हा ती गर्भवती होती.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: फाइल फोटो)

Madhya Pradesh Shocker: इंदूरमध्ये एका अल्पवयीन आईने आपल्या अडीच महिन्यांच्या चिमुरडीचा गळा दाबून खून केला. अल्पवयीन आईने पोलिसांना सांगितले, मूल वारंवार रडत असे. ते नीट हाताळता आले नाही, म्हणून त्याची हत्या केली. हे प्रकरण खजराना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. अल्पवयीन मुलगी वर्षभरापूर्वी प्रियकरासह घरातून पळून गेली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलच्या बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती.

पोलिसांना अल्पवयीन मुलगी सापडली तेव्हा ती गर्भवती होती. यानंतर प्रियकरावर पॉक्सो कायदा आणि बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. स्टेशन प्रभारी दिनेश वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, खजराना भागात राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी जुलै 2020 मध्ये परिसरातील रहिवासी फरहानसोबत पळून गेली होती. कुटुंबाने मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. एका वर्षानंतर, ऑक्टोबर 2021 मध्ये, अल्पवयीन आणि फरहानचा पोलिसांनी इंदूरजवळील पिथमपूर परिसरातून शोध घेतला. पोक्सो कायद्यान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी फरहानला तुरुंगात पाठवण्यात आले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर होती. 15 मार्च रोजी तिने मुलाला जन्म दिला. तसेच तिने 31 मे रोजी मुलाचा गळा आवळून खून केला. (हेही वाचा - Suicide: प्रेमवीरांनी पळून जाऊन लग्नाचा रचला प्लॅन, मात्र प्रियकर पोहोचलाच नाही, तरुणीची आत्महत्या)

फरहान तुरुंगात गेल्यानंतर अल्पवयीन मुलगी त्याला बाहेर काढण्यासाठी कुटुंबीयांवर सतत दबाव आणत होती. यानंतर कुटुंबीयांनी न्यायालयात अर्ज देऊन फरहानला तुरुंगातून बाहेर काढले. तोपर्यंत आरोपीने 5 महिने तुरुंगात काढले होते. पोलिसांनी कुटुंबीयांना मुलाचे डीएनए करून घेण्यास सांगितले होते. मूल अशक्त जन्माला आले होते. यामुळे कुटुंबीय डीएनए चाचणी करण्यास नकार देत होते. काही दिवसांपूर्वी खजराणा पोलिस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांनी डीएनए चाचणी करण्यास सांगितले असता, कुटुंबीयांनी मुलाच्या मृत्यूची माहिती दिली. यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आईला ताब्यात घेऊन चौकशी केली.

आईने दिली गुन्ह्याची कबुली -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत अल्पवयीन मुलीने 31 मे रोजी मुलाची तब्येत बिघडत असल्याचे सांगितले. परिसरातील एका खासगी रुग्णालयात मुलाला घेऊन गेल्याचीही चर्चा होती. पोलिसांनी मुलीकडून कारण जाणून घेतले असता तिने सांगितले की, मुलाला पावडर दूध दिले जात आहे. त्यामुळे त्याच्या घशात दूध अडकून त्याला श्वास घेता येत नव्हता. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. मुलीने अनेकदा आपले म्हणणे बदलून उलटसुलट चर्चा केल्यानंतर पोलिसांना संशय आला.

त्यानंतर पोलिसांनी कडक शब्दात विचारणा केली असता, मुलीने आपला गुन्हा कबूल करताना सांगितले की, मी त्याला हाताळू शकत नाही. तो दिवसभर रडायचा. या कारणामुळे तिने चिमुरड्याचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला बालनिरीक्षण गृहात पाठवले आहे.