Karnataka Ganagrape: धक्कादायक! शाळेत चाललेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल, दोघांना अटक

देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत.

Image used for representational purpose | (Photo Credits: File Image)

देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे सत्र थांबायला तयार नाहीत. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच कर्नाटकच्या (Karnataka) दक्षिण कन्नडमधील (Dakshina Kannada) बांटवाल तालुकाच्या (Bantwal) आमटडी गावातून (Amtady Village) धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाळेत चाललेल्या एका 16 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून अन्य 3 जण फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडत मुलगी शुक्रवारी सकाळी शाळेत जात होती. दरम्यान, रस्त्याने जात असताना आरोपींनी तिला कारमध्ये टाकून तिचे अपहरण केले. त्यानंतर एका निर्जन स्थळी तिला नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला ब्रह्मरकूटलू येथे आणून सोडले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पीडिताच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 2 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर अन्य 3 आरोपींचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पीटीआयने दिली आहे. हे देखील वाचा- Kerala Murder Case: पिरावोममध्ये एका व्यक्तीने झोपेत पत्नीची केली हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय दंड संहिताच्या कलम 366 (अ) 376 डी, 506 आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर पालकवर्गांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.