Krishna Janmabhoomi-Shahi Idgah Dispute: मथुरा कृष्ण जन्मभूमी वादावर सुनावणी होणार; जिल्हा न्यायालयाने दिली परवानगी
सिंग यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची सुनावणी 1 जुलै रोजी होणार आहे.
Krishna Janmabhoomi-Shahi Idgah Dispute: वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर, मथुरा जिल्हा न्यायालयाने (Mathura District Court) गुरुवारी शाही इदगाह मशीद (Shahi Idgah Masjid) हटवण्यासंदर्भात कनिष्ठ न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीस परवानगी दिली. याआधी मंगळवारी मथुरेच्या न्यायालयात सुरू असलेल्या श्रीकृष्ण जन्मभूमी(Krishna Janmabhoomi) शाही इदगाह वादाच्या प्रकरणात शाही ईदगाह संकुल सील करण्याची मागणी करण्यात आली होती.
मथुरेच्या न्यायालयात सुरू असलेल्या श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वादाच्या प्रकरणात श्रीकृष्ण जन्मभूमी आंदोलन समितीचे अध्यक्ष आणि वादी वकील महेंद्र प्रताप सिंह यांनी अर्ज दाखल करून शाही ईदगाह संकुल सील करण्याची मागणी केली आहे. सिंग यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची सुनावणी 1 जुलै रोजी होणार आहे. (हेही वाचा - Gyanvapi Mosque Contoversy: ज्ञानवापी प्रकरणातील सुनावणीला कनिष्ठ न्यायालयात स्थगिती, उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी)
अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, या संदर्भात दावा दाखल केल्यापासून प्रतिवादी बाजूचे शाही ईदगाह व्यवस्था समितीचे लोक ईदगाहचे हिंदू मंदिर असल्याबाबतचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ईदगाहवर विशेष सुरक्षा अधिकारी नेमण्याची आणि पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता दूर करण्यासाठी इतर कोणत्याही व्यक्तीच्या ईदगाहमध्ये प्रवेशावर निर्बंध घालण्याची मागणीही सिंह यांनी केली आहे.
सिंग यांनी त्यांच्या अर्जासोबत वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद प्रकरणात दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाने दिलेल्या आदेशाची प्रतही जोडली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये, दिवाणी न्यायालयाने हा खटला 'राइट्स इश्यू' नसल्याचे सांगून फेटाळला होता. म्हणजेच या प्रकरणी दावा ठोकण्याचा अधिकार कोणालाही नाही. हे प्रकरण जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात गेले. आज जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयाने फिर्यादीची फेरविचार याचिका मान्य करून पुढील सुनावणीसाठी 1 जुलै रोजी तारीख निश्चित केली आहे.
या याचिकेत 2.37 एकर जमीन सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. श्री कृष्ण जन्मभूमीच्या एकूण 13.37 एकर जमिनीपैकी 11 एकर जागेवर श्री कृष्ण जन्मस्थानाची स्थापना झाल्याचे सांगितले जाते. तर शाही इदगाह मशीद 2.37 एकर जागेवर बांधली आहे. ही 2.37 एकर जमीन मोकळी करून श्रीकृष्ण जन्मभूमीत समाविष्ट करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. भगवान कृष्णाचे जन्मस्थान असलेल्या केशवदेव मंदिराच्या भूमीवर ईदगाह बांधण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याप्रकरणी संस्थेला तडजोड करण्याचा अधिकार नाही, असे फिर्यादींचे म्हणणे आहे.