Chhindwara Murder Case: छिंदवाड्यामध्ये सामुहिक हत्येने खळबळ; पत्नीशी भांडण झाल्यानंतर कुटुंबातील 8 सदस्यांची कुऱ्हाडीने हत्या, नंतर आरोपीने गळफास घेत केली आत्महत्या

तो अंमली पदार्थांचे व्यसनी होता का, याचाही तपास सुरू आहे. ही घटना रात्री 3 वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Axe प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Chhindwara Murder Case: मध्य प्रदेशातील छिंदवाडा (Chhindwara) येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील माहुलझीर पोलीस ठाण्यांतर्गत बोदल कचर गावात आदिवासी कुटुंबातील 8 जणांची हत्या (Murder) करण्यात आली. हत्येनंतर आरोपीनेही गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली.

मृतांमध्ये आरोपीची पत्नी आणि कुटुंबीयांचा समावेश आहे. आरोपीने भावाच्या एका मुलावरही हल्ला केला होता, मात्र त्याने जीव वाचवण्यासाठी पळ काढला. त्याने यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व लोक जवळपासच्या घरात राहत होते. (हेही वाचा -Rajasthan Shocker: रील बनवण्यासाठी तरुणाने 150 फूटांवरून खदानीत मारली उडी, युवकाचा मृत्यू; VIDEO व्हायरल)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे. तो अंमली पदार्थांचे व्यसनी होता का, याचाही तपास सुरू आहे. ही घटना रात्री 3 वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीचा पत्नीसोबत वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाद सुरू असताना ही घटना घडली.  (हेही वाचा - Mizoram Quarry Collapse: मिझोराममध्ये दगडाची खाण कोसळून 10 ठार, अनेकजण बेपत्ता; बचावकार्य सुरू)

घटनेनंतर मृतांचे मृतदेह घरात विखुरले होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोपीने आधी पत्नीचा कुऱ्हाडीने वार केला, त्यानंतर आई, बहीण, भाऊ, वहिनी आणि पुतण्यांची हत्या केली. एसपी मनीष खत्री यांनी सांगितले की, आरोपीचे लग्न 21 मे रोजी झाले होते.

आरोपी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे.आरोपीने आई (55), भाऊ (35), वहिनी (30), बहीण (16), पुतण्या (5), दोन भाची (4 आणि दीड वर्ष) यांची हत्या केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif