Manu Bhaker Meets Rahul Gandhi: ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरने दिल्लीत घेतली राहुल गांधींची भेट, See Pic

या भेटीदरम्यान, मनूचे पालक आणि प्रशिक्षकही उपस्थित होते. मनू भाकर यांनी राहुल गांधींना मिठाईही खाऊ घातली आहे.

Manu Bhaker Meets Rahul Gandhi (Photo Credit - X/@INCIndia)

Manu Bhaker Meets Rahul Gandhi: पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) मध्ये दुहेरी पदक विजेती मनू भाकर (Manu Bhaker) बुधवारी सकाळी भारतात परतली आहे. भारतात मनूचे भव्य स्वागत करण्यात आले. विमानतळाच्या बाहेर येताच मनूसह तिचे प्रशिक्षक जसपाल राणा (Jaspal Rana) यांचेही जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री भगवंत मान (Haryana CM Bhagwant Mann) यांनी मनू भाकर यांची भेट घेतली. याशिवाय, शुक्रवारी दिल्लीत मनू भाकर हिने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, मनूचे पालक आणि प्रशिक्षकही उपस्थित होते. मनू भाकर यांनी राहुल गांधींना मिठाईही खाऊ घातली आहे.

याआधी, बुधवारी भाकर यांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांची राष्ट्रीय राजधानीतील अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर मनूने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली होती. यानंतर राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना लिहिले की, 'पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी दोन कांस्यपदके जिंकून इतिहास रचणारी भारताची दिग्गज नेमबाज मनू भाकर हिला भेटून आनंद झाला. तिच्या या अतुलनीय कामगिरीने प्रत्येक भारतीय आनंदित झाला आहे. तिच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.' (हेही वाचा -Olympic Games Paris 2024: Manu Bhaker चं पॅरिस ऑलिम्पिक मध्ये हॅटट्रिकचं स्वप्न भंगलं, 25 मीटर नेमबाजीत चौथ्या क्रमांकावर मानावं लागलं समाधान!)

काँग्रेस ट्विट - 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनूची कामगिरी -

हरियाणातील झज्जर येथील रहिवासी असलेल्या मनूने महिलांच्या वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्य आणि सरबज्योत सिंगसह मिश्र स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. पॅरिसमधून तीन पदकांसह परतणाऱ्या मनूचे सर्वत्र कौतुक होत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif