Manmohan Singh Funeral: मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर निगम बोध घाटावर करण्यात येणार अंत्यसंस्कार; दिल्ली पोलिसांनी जारी केली Traffic Advisory
त्यानंतर सकाळी 11.45 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी पक्षाच्या मुख्यालयात सकाळी साडेआठ वाजल्यापासून लोक अंत्यदर्शन घेतील.
Manmohan Singh Funeral: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Former PM Dr. Manmohan Singh) यांच्यावर आज दिल्लीतील निगम बोध घाटावर (Nigam Bodh Ghat) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ.मनमोहन सिंग यांची अखेरची यात्रा काँग्रेस मुख्यालयातून सकाळी 9.30 वाजता निगम बोध घाटाकडे निघेल. त्यानंतर सकाळी 11.45 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी पक्षाच्या मुख्यालयात सकाळी साडेआठ वाजल्यापासून लोक अंत्यदर्शन घेतील. काँग्रेस पक्षाच्या बाहेरून काही व्हिडिओ समोर आले आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव सकाळी साडेआठ वाजता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर कौटुंबिक रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दिल्ली पोलिसांनी जारी केली Traffic Advisory -
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या शनिवारी अंत्यसंस्कार होण्याआधी दिल्ली वाहतूक पोलिसांनी एक सूचना जारी केली आहे. यावेळी अनेक परदेशी मान्यवर, व्हीआयपी/व्हीव्हीआयपी आणि सर्वसामान्य जनता निगम बोध घाटाला भेट देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे राजा राम कोहली मार्ग, राजघाट रेड लाईट, सिग्नेचर ब्रिज आणि युधिष्ठिर सेतू येथे वळवण्यात आले आहे. सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत रिंग रोड (महात्मा गांधी मार्ग), निषाद राज मार्ग, बुलेवर्ड रोड, एसपीएम मार्ग, लोथियन रोड आणि नेताजी सुभाष मार्गावर वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. (वाचा: Manmohan Singh Passes Away: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन, मी एक गुरु आणि मार्गदर्शक गमावले- राहुल गांधी )
परिणामी नागरिकांना हे रस्ते आणि मार्ग टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे, तसेच ज्या भागातून अंत्ययात्रा निघणार आहे त्या भागातून न जाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. जुने दिल्ली रेल्वे स्थानक, ISBT, लाल किल्ला, चांदनी चौक आणि तीस हजारी न्यायालयाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मार्गात होणारा विलंब लक्षात घेऊन पुरेसा वेळ देऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (हेही वाचा -Dr Manmohan Singh Images Download For Whatsapp Status: डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्हाट्सअॅप स्टेटस इमेज, इथून करा डाऊनलोड)
सार्वजनिक वाहतूक वापरण्याबाबत सल्ला -
रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. वाहने नियोजित पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत. रस्त्याच्या कडेला पार्किंग टाळावे कारण यामुळे वाहतुकीच्या सामान्य प्रवाहात अडथळा येतो. कोणतीही असामान्य किंवा अनोळखी वस्तू किंवा व्यक्ती संशयास्पद स्थितीत दिसल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले. वयाशी संबंधित आजारांमुळे ते घरीच अचानक बेशुद्ध पडले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मनमोहन सिंग 1991 ते 1996 या काळात देशाचे अर्थमंत्री होते. या काळात त्यांनी उदारीकरणाचे धोरण स्वीकारून देशाला आर्थिक संकटातून वाचवले. 2004 ते 2014 या काळात त्यांनी भारताचे 13 वे पंतप्रधान म्हणून काम केले. त्यांचा कार्यकाळ विशेषतः आर्थिक संकटांच्या काळात त्यांच्या स्थिर नेतृत्वासाठी आणि भारताच्या अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी त्यांच्या योगदानासाठी कायम लक्षात ठेवला जाईल.