पत्नीला लागले होते Tik-Tok चे वेड, पतीने रागाच्या भरात केला खून; सोशल मीडियामुळे दोन मुले असलेल्या संसाराची वाताहत

यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

Image used for represenational purpose (File Photo)

एका व्यक्तीने 'टिक टॉक' (Tik-Tok Videos) च्या आहारी गेलेल्या आपल्या पत्नीचा चाकूने हल्ला करून खून केल्याची घटना घडली आहे. तामीळनाडूच्या (Tamil Nadu) कोयंबतूर (Coimbatore) येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, प्रकरणाची चौकशी सुरु आहे. आपली पत्नी सोशल मीडियावर जास्त सक्रीय असते या गोष्टीचा राग या नवऱ्याच्या मनात होता, त्यामुळे रागाच्या भरात त्याच्याकडून हे कृत्य घडले. यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोवाई जवळ अरिवोलिनगर येथे राहणारा कनकराज (35) हा मजदुरी करतो. त्याची पत्नी नंदिनी (28) कोवाई जवळील एका अभियांत्रिकी कॉलेजमध्ये काम करते. घरात चालू असणाऱ्या पारिवारिक कलहामुळे कनकराज आणि नंदिनी हे दोन वर्षांपासून वेगळे राहत होते. याच दरम्यान नंदिनीला काही महिन्यांपासून टिक टॉकचे वेड लागले होते. या वेडापायी तिने इंटरनेटवर टिक टॉकचे अनेक व्हिडिओ अपलोड केले होते. याबाबत गुरुवारी कनकराजने नंदिनीला फोन करून, टिक टॉक अॅपमध्ये व्हिडिओ अपलोड करण्यास मनाई केली. तसेच घरी परत येणास सुचवले. (हेही वाचा: Tik Tok पुन्हा वादात, जामा मशिदीत डान्स व्हिडीओ बनवल्याने यापुढे केवळ प्रार्थनेसाठीच मिळणार प्रवेश)

बोलताना फोन कट झाला त्यामुळे त्याने परत नंदिनीला फोन केला मात्र तिचा फोन व्यस्त येत होता. कनकराजने अनेकवेळा प्रयत्न केला मात्र खूप वेळ काही बोलणे झाले नाही. यामुळे नाराज कनकराज शुक्रवार नंदिनी जिथे काम करत होती त्या कॉलेजमध्ये पोहोचला. तिथे दोघांमध्ये टिक टॉक व्हिडीओ बाबत बोलणे झाले. शाब्दिक चकमक वाढत जाऊन भांडण सुरु झाले. त्यानंतर कनकराजने रागात आपल्याकडे आधीपासूनच असलेल्या चाकूने नंदिनीवर हल्ला केला. या हल्ल्यात नंदिनी इतकी गंभीर जखमी झाली की तिचा जागीच मृत्यू झाला.