Chhattisgarh: एकाच तरूणावर दोघींचा जडला जीव; मग पुढे काय झाले? हे पाहिल्यानंतर संपूर्ण गावच झाले हैराण

हा लग्न सोहळा सगळ्यांचा आश्चर्यचकीत करून सोडणारा ठरला आहे.

Chhattisgarh: एकाच तरूणावर दोघींचा जडला जीव; मग पुढे काय झाले? हे पाहिल्यानंतर संपूर्ण गावच झाले हैराण
Image For Representation (Photo Credits: Pixabay)

बस्तर (Bastar) जिल्ह्यातील तिकारा लोहंगा (Tikara Lohnga) येथे राहणाऱ्या एका युवकाने रविवारी एकाच मंडपात दोन मुलींसोबत लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. हा लग्न सोहळा सगळ्यांचा आश्चर्यचकीत करून सोडणारा ठरला आहे. महत्वाचे म्हणजे, तिन्ही कुटुंबाची या लग्नासाठी संमती होती. एवढेच नव्हेतर, त्यांच्या लग्न पत्रिकेतही दोघी मुलींचे नाव छापण्यात आले होते. हे तिघेही गेल्या एक वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. या अनोख्या लग्नात सहभागी झालेल्या लोकांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळाला आहे. सोशल मीडियावर हे लग्न व्हायरल झाले आहे. सर्व गावकऱ्यांसमोर लग्न होण्याची बस्तरमधली ही पहिली घटना आहे. या संदर्भात एएनआयने माहिती दिली आहे.

चंदू मौर्य (वय, 24) असे नवरदेवाचे नाव आहे. चंदू हा बस्तर पासून जवळपास 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या तिकारा लोहंगा येथे राहतो. चंदूचे करंजीच्या हसीना बघेल आणि एरंडवालची सुंदरी कश्यप यांच्याशी प्रेमसंबंध होते. चंदूचे हसीनावर प्रेम आहे, हे सुंदरीला माहिती होते. तसेच चंदूचे सुंदरीशी प्रेमसंबंध असल्याचे हसीनाला कळाले होते. दरम्यान, तिन्ही कुटुंबियातील लोकांना यासंदर्भात माहिती झाली. हे देखील वाचा- Honour Killing: मिर्जापूर येथे शेजारी राहणाऱ्या परजातीच्या तरूणासोबत जुळले प्रेम; आई-वडिलांनी ओढणीने गळा आवळून केली अल्पवयीन मुलीची हत्या

एएनआयचे ट्विट-

मात्र, ज्यावेळी लग्नाचा विषय निघाला तेव्हा चंदूने दोन्ही मुलींशी लग्न करण्याचा प्रस्ताव आपल्या नातेवाईकांसमोर ठेवला. दोन्ही मुलींवर आपले जीवापाड प्रेम आहे, यामुळे दोघींपैकी कोणालाही सोडण्याची त्याची ईच्छा नाही, असे त्याने सांगितले. त्यानंतर मुलींच्या नातेवाईकांना या लग्नाला होकार दिला. त्यानंतर हा लग्न सोहळा पार पडला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 09, 2021 06:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).