Niti Aayog Meeting: पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील नीती आयोगाच्या बैठकीत माईक बंद केल्याचा ममता बॅनर्जींचा दावा; निर्मला सीतारामन यांनी सांगितले खरे कारण
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी ममता यांच्या या आरोपांचे खंडन केले आहे. सीतारामन यांनी म्हटलं आहे की, ममता बॅनर्जी मीडियामध्ये बोलल्या आहेत की त्यांचा माईक बंद करण्यात आला आहे, हे पूर्णपणे खोटे आहे.
Niti Aayog Meeting: NITI आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलची 9वी बैठक (Niti Aayog Meeting) शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी त्यांना बोलण्याची संधी दिली नसल्याचा आरोप केला आहे. केंद्र सरकारीने ममता बॅनर्जींचे दावे फेटाळून लावले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी ममता यांच्या या आरोपांचे खंडन केले आहे. सीतारामन यांनी म्हटलं आहे की, ममता बॅनर्जी मीडियामध्ये बोलल्या आहेत की त्यांचा माईक बंद करण्यात आला आहे, हे पूर्णपणे खोटे आहे.
ममता बॅनर्जींचा दावा खोटा -
ममता बॅनर्जींच्या आरोपांवर निर्मला सीतारामन म्हणाल्या, 'सीएम ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक मुख्यमंत्र्यांना बोलण्यासाठी योग्य वेळ देण्यात आला होता. ममता बॅनर्जी यांनी त्यांचा माईक बंद असल्याचा दावा केला होता, ते खरे नाही. त्यांनी खोट्या गोष्टींवर आधारित कथा तयार करण्याऐवजी खरे बोलावे.' (हेही वाचा - Mamata Banerjee Dance Video: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सभेदरम्यान महिलांसोबत स्टेजवर केला डान्स)
ममता बॅनर्जी सभेतून निघून गेल्या -
ममता बॅनर्जी नीती आयोगाची बैठक अर्धवट सोडून निघून गेल्या. यासंदर्भात बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'मी सभेवर बहिष्कार टाकला आहे. चंद्राबाबू नायडू यांना बोलण्यासाठी 20 मिनिटे देण्यात आली होती. आसाम, गोवा, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी 10-12 मिनिटे बोलले. पाच मिनिट बोलल्यानंतर मला थांबवण्यात आलं. हे चुकीचे आहे.' (हेही वाचा - Mamata Banerjee Injured: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी; दुर्गापूरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये चढताना घसरला पाय)
पहा व्हिडिओ -
ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, 'विरोधी पक्षाकडून मी एकटीच इथे प्रतिनिधित्व करत आहे आणि या बैठकीत सहभागी होत आहे. कारण मला सहकारी संघराज्य मजबूत करण्यात अधिक रस आहे. नीती आयोगाकडे आर्थिक अधिकार नाहीत, ते कसे चालेल? आयोगाला आर्थिक बळ द्या किंवा नियोजन आयोग परत आणा. मी माझा निषेध नोंदवला असून मी बैठकीतून बाहेर पडले आहे.'
केंद्राने सरकार चालवताना सर्व राज्यांचा विचार करायला हवा. मी केंद्रीय निधीबद्दल सांगत होते, जो पश्चिम बंगालला दिला जात नाही, तेव्हा त्यांनी माझा माईक बंद केला. विरोधी पक्षाकडून मी एकटीच बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे तुम्ही खुश व्हायला हवं. परंतु, तुम्ही त्याऐवजी तुम्ही तुमच्या पक्षाला आणि सरकारला जास्त प्राधान्य देत आहात. हा केवळ बंगालचा अपमान नाही, तर सर्व प्रादेशिक पक्षांचाही अपमान आहे. हा माझाही अपमान आहे.