West Bengal By Election: ममता बॅनर्जींची मोठी घोषणा! शत्रुघ्न सिन्हा आसनसोलमधून लोकसभा तर बाबुल सुप्रियो बालीगंजमधून लढणार विधानसभा पोटनिवडणूक
TMC प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
West Bengal By Election: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी रविवारी आसनसोल लोकसभा (Asansol Loksabha) जागेच्या पोटनिवडणुकीसाठी शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आणि बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांना तृणमूल काँग्रेसचे उमेदवार म्हणून बालीगंज विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीसाठी (Vidhansabha by Election from Ballygunge) उमेदवारी दिली.
TMC प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत माहिती दिली की, "तृणमूल काँग्रेसच्या वतीने जाहीर करताना आनंद होत आहे की, माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे आसनसोल लोकसभा जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आमचे उमेदवार असतील. तसेच माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध गायक बाबुल सुप्रियो बालीगंज विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आमचे उमेदवार असतील. जय हिंद, जय बांगला, जय मां-माटी- मानुष." (वाचा - Goa Elections Congress On TMC: गोव्यात काँग्रेसचा पराभव करण्यासाठी ममता बॅनर्जींनी केली भाजपला मदत, अधीर रंजन चौधरी यांचा TMCवर हल्ला)
आसनसोल लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा भारतीय जनता पक्षाचे खासदार राहिलेले सुप्रियो यांनी गेल्या वर्षी पक्ष सोडला आणि टीएमसीमध्ये प्रवेश केल्या. त्यामुळे ही जागा रिक्त झाली. त्याचवेळी राज्यमंत्री सुब्रत मुखर्जी यांच्या निधनामुळे बालीगंज विधानसभा जागा रिक्त झाली होती.
12 एप्रिल ला होणार पोटनिवडणूक -
पश्चिम बंगालमध्ये 12 एप्रिल रोजी एक लोकसभा आणि चार विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या दोन दिग्गजांच्या निवडीवरून राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. या वेळी भाजपला या जागांवर यश मिळते की, तृणमूल काँग्रेसला हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. बाबुल सुप्रियो हे 2014 आणि 2019 मध्ये सलग दोन वेळा आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. त्याचवेळी चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सोडून टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)