Madhya Pradesh: मध्य प्रदेशात चक्क रस्ताच गेला चोरीला, ग्रामस्थांकडून पोलिसांत तक्रार दाखल
परंतु, अलीकडे अशी विचित्र घटना समोर आली आहे, ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, दागिने, पैसे, वाहने किंवा इतर मोल्यवान वस्तूंची चोरी झाल्याची अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील.
1Km Road Stolen Overnight: मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) यापूर्वी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे नोंदवली गेली होती. परंतु, अलीकडे अशी विचित्र घटना समोर आली आहे, ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, दागिने, पैसे, वाहने किंवा इतर मोल्यवान वस्तूंची चोरी झाल्याची अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. परंतु, मध्य प्रदेशात झालेल्या चोरीच्या प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सिधी (Sidhi) जिल्ह्यातील मेंढरा गावातील एक किलोमीटरचा रत्ता रोतोरात चोरीला गेल्याची बातमी आगीसारखी पसरत आहे. याप्रकरणी स्थानिक ग्रामस्थांनी मांझोली पोलीस ठाण्यातही फिर्याद दिल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेंढरा गावातील रस्ता रात्रीच्या सुमारास अस्तित्वात होता. पण सकाळी तो गायब झाला आहे. परंतु, हा रस्ता गायब झाल्याने आणि मुसळधार पाऊस होत असल्याने स्थानिकांना प्रवास करणे अवघड होत आहे. हे प्रकरण जनपद पंचायत कार्यालयातही पोहोचले. हा प्रकार ऐकल्यानंतर अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत. रस्ता गायब झाल्याची तक्रार प्राप्त झाल्याच्या माहितीला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! हुंडा मिळाला नाही म्हणून पतीने नवविवाहितेवर करवला मित्रांकडून सामुहिक बलात्कार; गुप्तांगाला मिरची व बाम लावून केले बेशुद्ध
स्थानिक लोकांच्या महण्यानुसार, या गावातील रस्ता कागदपत्रांवर दिसून येत आहे. या रस्त्यासाठीचा निधी सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. यामुळे एकाच रात्रीत संपूर्ण रत्ता गायब होऊन त्याठिकाणी केवळ खड्डे उरले आहेत.
उप सरपंच रमेश कुमार यादवने या भ्रष्टाचारा पर्दाफाश केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी प्रभाग क्रमांक 15 मध्ये रस्ता सुस्थितीत होता. परंतु, सकाळी तो चोरीला गेला आणि तिथेच दिशादर्शक दगडही गायब झाला आहे. त्यानंतर ग्रामस्थ मंझोली जिल्हा पंचायत कार्यालयात पोहचले आणि रस्ता चोरीला गेल्याची तक्रार दिली. जनपद पंचायत मंझोली मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एल. प्रजापती म्हणाले की, काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी संपर्क रस्ता चोरीला गेल्याची तक्रार स्थानिकांनी त्यांच्याकडे केली होती आणि या प्रकरणाची चौकशी व्हावी.