LPG Price Today: एलपीजी गॅस सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर जुन्या किमतीतच उपलब्ध असेल.

LPG-Cylinder (फोटो सौजन्य -Wikimedia Commons)

LPG Price Today: नवरात्रीमध्ये एलपीजी सिलिंडर (LPG gas Cylinder) च्या दरात कपात करण्यात आली आहे. तथापि, देशातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडर (Commercial LPG Cylinder) च्या किमतीत ही कपात करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. IOCL नुसार, 1 ऑक्टोबरपासून दिल्लीत इंडेनच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 25.5 रुपये, कोलकाता 36.5 रुपये, मुंबई 32.5 रुपये, चेन्नईमध्ये 35.5 रुपये कमी असेल. 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर जुन्या किमतीतच उपलब्ध असेल.

व्यावसायिक सिलिंडरच्या नवीन किमती खालीलप्रमाणे -

14.2 किलो सिलिंडरचा दर -

देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरची किंमत निश्चित करतात. व्यावसायिक एलपीजी गॅस बहुतेक हॉटेल्स, खाद्यपदार्थांची दुकाने इत्यादींमध्ये वापरला जातो. त्यामुळे त्यांना किमतीतील कपातीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. सलग पाचव्या महिन्यात व्यावसायिक गॅसच्या किमती कमी झाल्या आहेत.