Uttar Pradesh Crime: ऑनलाईनमधून पैसे गमावले, त्यानंतर स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला, आरोपीला अटक
ऑनलाईन गॅमिंगमुळे एका तरुणाने चक्क सहा लाख रुपय गमावले.
Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील ललितपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑनलाईन गॅमिंगमुळे एका तरुणाने चक्क सहा लाख रुपय गमावले. सहा लाख रुपये गमवाल्यानंतर त्यांने जे केले ते धक्कादायक. या घटनेमुळे पोलिसही चक्कावले आहेत. या घटनेनंतर उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे. आता पर्यंत अनेकांनी ऑनलाईनच्या माध्यामातून पैसे गमावले आहेत. (हेही वाचा- मुंबईत घरात घुसून मित्रावर गोळीबार, पूर्व वैमनस्यातून आरोपीचा हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाईन गेमिंगमुळे तरुणाने सहा लाख रुपये गमावल्यानंतर त्याने स्वत: चे अपहरण झाल्याचा बनाव रचला. त्यानंतर त्याने मित्राला सांगून घराच्याकडून पैश्याची मागणी करण्यास सुरुवात केली. मित्राने त्याचा वडिलांना फोन केला आणि सांगितले की, तुमच्या मुलाचे अपहरण झाले आहे. मुलाला जीवे मारण्याची धमकी देत सहा लाख रोख रक्कम मागितली. अपहरणाचा खोटा फोटो ही त्यांना पाठवला होता. या घटनेची माहिती वडिलांनी पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी या घटनेची चक्र फिरवली आणि मुलाचा फोन ट्रेस केल्यानंतर घटनास्थळी पोसिल पोहचले.
घटनास्थळी पोहल्यावर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. मनोज पटेल याने सहा लाख रुपये ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गमवाले. घटनास्थळावरून मनोज सोबत त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेतले. चौकशीतून तिघांनी गुन्ह्याची कबुली केली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या घनटेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अखिलेश जोशी आणि बलवान लोधी या दोघानाही अटक करण्यात आले आहे.