Lok Sabha Election 2024 Phase 6: लोकसभा निवडणुक(Lok Sabha Election 2024)च्या सहाव्या टप्प्यासाठी 58 लोकसभा मतदारसंघात आज मतदान(Voting)पार पडत आहे. 8 राज्यांत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi)नी मतदारांना त्यांच मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक वोट महत्त्वाचे आहे. सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवर म्हटले आहे. (हेही वाचा:Lok Sabha Election 2024 Phase 6: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; 58 मतदारसंघात 25 मे रोजी मतदान )
या काळात कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मतदान केंद्राबाहेर तगडा बंदोबस्त ठेवला आहे. मोदी म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदारांना माझं आवाहन आहे की, त्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं. निवडणुकीत प्रत्येक मताला महत्व असतं. तसं तुमचंही मत महत्वाचं आहे". "लोकशाही तेव्हाच फुलून दिसते, जेव्हा निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक व्यक्ती सहभागी होऊन मतदान करतो. त्यामुळे माझं माता-भगिणींसह तरुणांना आणि इतर मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं", असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. (हेही वाचा:Lok Sabha Election 2024: 'मला परमात्म्याने पाठवले आहे, तोच माझ्या ऊर्जेचा स्त्रोत'; PM Narendra Modi यांनी सांगितले त्यांचे न थकण्याचे रहस्य (Watch Video))
लोकसभा चुनाव के छठे चरण के सभी मतदाताओं से मेरा निवेदन है कि वे अधिक से अधिक संख्या में मतदान के लिए आगे आएं। एक-एक वोट मायने रखता है और आपका वोट भी उतना ही महत्वपूर्ण है! लोकतंत्र तभी फलता-फूलता है और जीवंत दिखता है, जब चुनाव प्रक्रिया में जनता-जनार्दन की बढ़-चढ़कर भागीदारी होती…
— Narendra Modi (@narendramodi) May 25, 2024
कोणकोणत्या राज्यात मतदान?
दिल्लीतील सर्वच 10 जागा, उत्तर प्रदेशातील 14, हरियाणातील सर्व 10, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8, ओडिशातील 6, झारखंडमधील 4 आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेवर आज मतदान होत आहे.