Nabanna Abhiyaan Rally: पश्चिम बंगालमध्ये आंदोलन चिघळलं; परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर (Watch Video)
मात्र या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार केला. त्याशिवाय, पाण्याचा मारा आणि अश्रुधुराचा वापर केला.
Nabanna Abhiyaan Rally: कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि तिच्या हत्येच्या घटनेने देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेनंतर देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारला होता. सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यासाठी नवब्बा अभियान मोर्चाने आज हावडाब्रीजवर आंदोलन पुकारले. मात्र या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार केला. त्याशिवाय, पाण्याचा मारा आणि अश्रुधुराचा वापर केला.पोलिसांचा आंदलकांवर पाण्याचे फवारे मारतानाचा आणि लाठीचार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.(हेही वाचा: Kolkata Doctor-Rape Murder Case: कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, देशभरात निदर्शने)
हावडा येथील संत्रागाछी येथे आंदोलक जमा झाले होते. आंदोलकांनी यावेळी सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत तीव्र निषेध दर्शवला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. शहरात 6,000 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सुरक्षा वाढवण्यात आली होती. (हेही वाचा:Kolkata Rape-Murder Case: कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल; मंगळवारी होणार सुनावणी )
पाण्याचा मारा, अश्रुधुराचा वापर
कोलकाता पोलीस आणि हावडा शहर पोलिसांनी नबन्नाच्या आजूबाजूचा परिसरात 19 ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. शहरात इतरही महत्त्वाच्या ठिकाणी पाच ॲल्युमिनियम बॅरिकेड्स लावण्यात आल्या आहेत. पोलिसांव्यतिरिक्त कॉम्बॅट फोर्स, हेवी रेडिओ फ्लाइंग स्क्वॉड , रॅपिड ॲक्शन फोर्स, क्विक रिॲक्शन टीम आणि वॉटर कॅनन तैनात करण्यात आले आहेत. ड्रोनच्या माध्यमातूनही परिसरात नजर ठेवली जात आहे. अद्याप तेथे तणावपूरर्ण परिस्थिती आहे.