Man Killed Rat: पाण्यात बुडवून उंदीर मारणे तरुणाला पडले महागात; ओरीला अटक, Watch Video

मात्र पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला.

Rat (PC - Pixabay)

Man Killed Rat: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बदायूं (Budaun) मध्ये एका व्यक्तीला उंदराला (Rat) पाण्यात बुडवून मारल्याप्रकरणी 10 तास पोलिस कोठडीत राहावे लागले. मनोज कुमार असे आरोपीचे नाव आहे. त्याचबरोबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तथापि, मंडळ अधिकारी आलोक मिश्रा म्हणाले की, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा (Prevention Cruelty Animals Act) या प्रकरणात लागू होत नाही, कारण उंदीर प्राण्यांच्या श्रेणीत येत नाहीत. याबाबत आम्ही कायदेशीर अभिप्राय मागवला असून त्यानुसार कारवाई केली जाईल, असे मंडळ अधिकारी म्हणाले.

अधिकाऱ्याने पुढे बोलताना सांगितले की, प्राणी कार्यकर्ते विकेंद्र शर्मा यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. विकेंद्रने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने शेपटीला दगड बांधून उंदरावर अत्याचार केल्याचे आणि नाल्याच्या पाण्यात बुडवल्याचे मी पाहिले. आरोपी मनोज कुमारला विचारले असता त्याने हे कृत्य पुन्हा करणार असल्याचे उत्तर दिले. उंदराला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश मिळू शकले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. (हेही वाचा -Snake Bite: ज्योतिषाच्या सांगण्यावरून सापासमोर ठेवली जीभ; नागराजने दंश केल्यानंतर गमावली वाणी, Tamil Nadu मधील धक्कादायक घटना)

विशेष म्हणजे पोलिसांनी मृत उंदीर जप्त करून शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवला आहे. मात्र पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. यानंतर मृत उंदराला बदाऊनपासून 60 किमी अंतरावर असलेल्या बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत (आयव्हीआरआय) पाठवण्यात आले. (हेही वाचा -Dog Attack in Noida: नोएडात सोसायटीच्या लिफ्टमध्ये दोन मुलांवर पाळीव कुत्र्याचा हल्ला, पहा व्हिडिओ)

आणखी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, IVRI अधिकाऱ्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी एका आठवड्याचा अवधी मागितला आहे. ते म्हणाले की, तक्रारदाराने स्वतः मृत उंदराच्या तपासणीसाठी 225 रुपये दिले आहेत.