IPL Auction 2025 Live

Kesar Singh Gangwar Dies: भाजप आमदार केसर सिंह गंगवार यांचे कोरोनामुळे निधन

यातच आमदार केसर सिंह गंगवार (Kesar Singh Gangwar) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाने (Coronavirus) संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. यातच आमदार केसर सिंह गंगवार (Kesar Singh Gangwar) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. केसर गंगवार हे 64 वर्षाचे होते. कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर त्यांच्यावर नोएडा येथील येथार्थ रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रेदश येथील ते तिसरे आमदार होते. केसर सिंह गंगवार यांच्या निधनावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या मृत्युनंतर राजकारणात एकच खळबळ माजली आहे.

यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही आमदार केसरसिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. या व्यतिरिक्त प्रदेश भाजपा अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि सरचिटणीस (संघटना) सुनील बन्सल यांनीही गंगवार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. हे देखील वाचा- Serum Institute चे सीईओ Adar Poonawalla यांना 'Y' दर्जाची सुरक्षा; MHA चे आदेश

योगी आदित्यनाथ यांचे ट्वीट-

कोरोनामुळे मरण पावलेले केसर सिंह गंगवार हे भाजपचे तिसरे आमदार आहेत. याआधी भाजप आमदार रमेश दिवाकर आणि सुरेश श्रीवास्तव यांचे कोरोनामुळे निधन झाले होते.