suicide News PC TWITTER

Keral Suicide News: केरळच्या वायनाडा येथील महाविद्यालयाच्या वसतिगृहात एका 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. तरुणाने 18 फेब्रुवारी रोजी बाथरुममध्ये  लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली.या प्रकरणाचा तपास लागला असून आरोपीचा गुन्हा समोर आणला आहे. पशुवैद्यकिय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तरुणाने आत्महत्या का केली याचे तपास सीबीआयकडे देण्यात आला. (हेही वाचा- दिल्ली मेट्रोत तैनात CISF जवानाने स्वतःवर झाडली गोळी)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण केरळच्या वायनाड जिल्ह्यातील पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान महाविद्यालयात द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. सिध्दार्थन जेएस असं आत्महत्या करण्याऱ्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या केल्यानंतर सीबीआयने हे प्रकरण उघडकले आहे. सीबीआयने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, सिध्दार्थन जेएस त्याचा  वर्गमित्राने आणि सीनीएरसने २९ तास न थांबता अत्याचार आणि छळ केला. छळाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचे टोकाचे पाऊल उचलले आहे.

https://marathi.latestly.com/socially/india/news/maharashatra-cisf-jawan-shoots-himself-while-deployed-in-delhi-metro-paschim-vihar-metro-539263.html

इंग्रजी दैनिक द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, केरळ पोलिसांनी सीबीआयकडे सोपवलेल्या फाईलमधील माहितीचा अहवाल दिला आहे. सिध्दार्थनाल त्याचा मित्राने मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सीबीआयने चौकशी सुरु केली. 1 मार्च रोजी, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मृत विद्यार्थी सिद्धार्थन जेएसच्या घरी भेट दिली आणि सिद्धार्थनच्या शोकग्रस्त पालकांप्रती शोक व्यक्त केला.