iPhone: आयफोन बनवणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात तोडफोड; पगार वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी संतप्त
गेल्या अनेक महिन्यांपासून पगार न दिल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत तोडफोड आणि जाळपोळ केली.
कर्नाटकातील (Karnataka) कोलार (Kolar) जिल्ह्यात आयफोन बनवणाऱ्या कारखान्यात (Wistron Corporation) तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पगार न दिल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत तोडफोड आणि जाळपोळ केली. एवढेच नव्हेतर, कर्मचार्यांनी आवारात असलेल्या मोटारी पलटी केल्या आणि फर्निचरचेही नुकसान केले. दरम्यान, तोडफोन करणारे सर्व कर्मचारी तैवानमध्ये मुख्यालय असलेल्या विस्ट्रॉन कॉर्पोरेशनमध्ये काम करतात. यासंदर्भात एएनआय वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन बनविण्याचा हा कारखाना कोलार जिल्ह्यातील नरसपुरा औद्योगिक क्षेत्रात आहे. पगार वेळेवर मिळत नसल्याने कर्मचार्यांनी दगडफेक केली, काचेच्या खिडक्या तोडल्या, वाहने, फर्निचर, संगणक व लॅपटॉप खराब केले. या हिंसक घटनेत अनेक कर्मचारी सामील होते. हे देखील वाचा- Farmers Protest Against Farm Laws: शेतकरी आज दिल्ली-जयपूर महामार्ग वर चक्का जाम आंदोलन करण्याच्या तयारीत
एएनआयचे ट्विट-
महत्वाचे म्हणजे, या कंपनीतील अनेक कर्मचारी 12 तासांहून अधिक काम करतात. दरम्यान, सात-आठ तास काम करणाऱ्या व्यक्तींना केवळ दोनशे ते तिनशे रुपये दिले जातात. मात्र, तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांनी कंपनीत तोडफोड केली, अशी माहिती न्युज 18 लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे.
या हिंसाचाराच्या किंवा पगाराच्या बाबतीत कंपनीकडून सध्या कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. कामगार संघटनेच्या एका नेत्याने सांगितले की, कंत्राटावर कामावर असलेल्या बहुतांश कर्मचार्यांना वेळेवर मानधन दिले जात नाही आणि त्यांना वेतन कपातीची भीती वाटत आहे. विस्ट्रोन कॉर्पोरेशन आयफोन 7, लेनोवो, मायक्रोसॉफ्ट आणि इतर ब्रँड्ससह आयफोनसाठी आयटी उत्पादन बनवतात.