कपील देव, गोविंदा, रवि किशन यांना फसवणूक प्रकरणात ८.१ लाख रुपयांचा दंड
कालांतराने ही कंपनी फसवणूक आणि आर्थिक अफरातफर करणारी असल्याचे उघड झाले
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपील देव, बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि रवि किशन यांना तब्बल ८.१ रुपयांचा दंड ठोणाविण्यात आला आहे. गुजरातमधील वडोदरा ग्राहक न्यायालयाने ही कारवाई केली. न्यायालयाने सांगितले की, या तिघांनी सनस्टार क्लबची सदस्यता विकण्यासठी कंपनीला प्रचार करण्यासाठी व फसवणूक करणाऱ्यांना त्यांची प्रतिमा वापरण्यास मान्यता दिली. कालांतराने ही कंपनी फसवणूक आणि आर्थिक अफरातफर करणारी असल्याचे उघड झाले. २०१७ मध्ये १८ लोकांनी वडोदरा जिल्ह्यातील ग्राहक न्यायालय मंचाकडे सनस्टार प्रमोटर रमन कपूर, त्यांची पत्नी सीमा कपूर आणि अन्य तिघाविरुद्ध याचिका दाखल केली होती.
तक्रार याचिकाकर्त्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या फसवणुकीची सुरुवात २०१६मध्ये झाली. एका फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याने फर्म मेंबरशीपसाठी त्यांच्याकडून १.२ ते ३ लाख रुपये घेतले. त्या काळात त्यांना सांगण्यात आले की, मेंबरशिपच्या बदल्यात त्यांना क्लबमध्ये राहण्याची सोय मोफत दिली जाईल. त्याशिवाय इतर लाभ मिळण्याचे आमिशही दाखवण्यात आले. दरम्यान, २०१७मध्ये त्यांचा खरा चेहरा समोर आला. कारण, संबंधीत फर्मने त्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित होण्यास सांगितले. यावर फर्मची मेंबरशिप देणाऱ्या दाम्पत्याने काहीच उत्तर न देता मौन बाळगले. (हेही वाचा, एक रुपयाच्या वसुलीसाठी, ८५ रुपयांची नोटीस; बँकेचा चोख कारभार, ९ कोटी बुडवून विजय माल्या मोकाट)
आपली फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच आरोपी कपील, गोविंदा आणि किशन यांच्या विरोधात अहमदाबाद आणि वौडदरा पोलिस स्थानकांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. काही पीडितांनी जागृत नागरिक, शहर ग्राहक संघ आदिंच्या माद्यमातून ग्राहक न्यायालयात धाव घेतली. तक्रारकर्त्यांनी आरोप केला की, या तीनही लोकप्रिय आमि मान्यवरांनी फसवणुक करणाऱ्या कंपनीला सहकार्य केले आहे. ग्राहक मंचाने तक्रारकर्त्यांचा आरोप योग्य ठरवत तसेच, बेकायदेशिर व्यापारास सहकार्य केल्याचा ठपका ठेवत या तिघांना दोषी ठरवले. तसेच, ग्राहक मंचाने या तिघांनी तक्रारकर्त्यांना प्रत्येकी १५-१५ हजार रुपये देण्याचेही आदेश दिले आहेत.