Agra Accident: टायर फुटल्याने कार उलटली, अपघातात कानपूर येथील उद्योगपतीच्या पत्नीचा मृत्यू

या अपघातात कानपूरच्या प्रसिध्द केसर पान मसाला कंपनीचे मालक हरिश माखिजा यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. इटावा येथील आग्रा लखनऊ एक्स्प्रेसवेवर प्रीती माखिजा यांच्या कारचा टायर अचानक फुटला आणि अपघात घडला.

Agra Accident: आग्रा (Agra) येथे भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात कानपूरच्या प्रसिध्द केसर पान मसाला कंपनीचे मालक हरिश माखिजा यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. इटावा येथील आग्रा लखनऊ एक्स्प्रेसवेवर प्रीती माखिजा यांच्या कारचा टायर अचानक फुटला आणि अपघात घडला. हेही वाचा-  संभाजीनगरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना; स्कॉर्पिओच्या धडकेत चौघांचा मृत्यू; 2 जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, केसर पान मसाला कंपनीचे मालक हरिश माखिजा यांची पत्नी प्रीती माखिजा, कानपूरचे प्रसिध्द मद्य व्यावसायिक तिलक राज शर्मा यांची पत्नी आणि एक चालक कारमधून प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात प्रीती माखिजा हिचा मृत्यू झाला तर दुसरी महिला आणि कार चालक गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली.

हरिश माखिजा आणि तिलक राज शर्मा एका खासगी कार्यक्रमात सहाभागी होण्यासाठी आपल्या कुटुंबियांसह आग्रा येथे जात असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी माध्यमांना माहिती दिली की, त्यांची कार ७९ मैनपूरीच्या करहल टोलजवळ येताच टायर फुटला आणि कार अचानक उलटली.

मृत महिलेचा मुलगा पियुष माखिजा यांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी मुसळधार पाऊस पडत होता आणि कार देखील भरधाव वेगात होती. यावेळी टायर फुटला आणि कार उलटली. या दुर्घटनेत माझा आईचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक महिला जखमी झाली आहे. पोलिसांना माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच जखमीला रुग्णालयात दाखल केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif