निर्भया प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायमूर्ती भानुमती यांना आली भोवळ

बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या कक्षात नेण्यात आले. त्यामुळे निर्भया प्रकरणात केंद्र सरकारच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

Justice R Banumathi fainted (PC - Facebook)

निर्भया सामूहिक बलात्कार (Delhi Nirbhaya Gang Rape Case) आणि हत्याकांड प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती भानुमती (Justice R Banumathi) यांना सुनावणीदरम्यान भोवळ (Dizziness) आली. बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या कक्षात नेण्यात आले. त्यामुळे निर्भया प्रकरणात केंद्र सरकारच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

या प्रकरणातील दोषी विनय शर्मा याच्या याचिकेवरील आदेश वाचल्यानंतर न्यायमूर्ती भानुमती या प्रकरणातील दोषींना स्वतंत्रपणे फाशी देण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या याचिकेवर सुनावणी घेत होत्या. याच दरम्यान त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर भानुमती यांना त्वरीत त्यांच्या चेंबरमध्ये नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - Nirbhaya Case: निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी विनय कुमार ला मानसिकदृष्ट्या ठीक ठरवत याचिका फेटाळली)

दरम्यान, निर्भया प्रकरणातील दोषी विनय शर्माचा दुसरा प्रयत्नही अपयशी ठरला आहे. राष्ट्रपतींच्या दया याचिका फेटाळण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत विनयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. विनयने स्वतःला मनोरुग्ण सांगत फाशीची शिक्षा न देण्याची मागणी केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने विनय मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे सांगितले आहे.