Bihar Murder Case: दैनिक जागरणचे पत्रकार विमल कुमार यांची अररियामध्ये गोळ्या झाडून निघृण हत्या, आरोपी फरार

बिहारमधील अररिया जिल्ह्यात एका पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Vimal kumar Pc twitter

Bihar Murder Case: बिहारमधील (Bihar) अररिया जिल्ह्यात एका पत्रकाराची (Journalist) गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. दैनिक जागरणचे पत्रकार विमल कुमार असे मृताचे नाव आहे. आज त्यांच्या राहत्या घरी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतला आहे. आरोपींचा तपास सुरु केला आहे. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

बिहारमधील अररिया जिल्ह्यात एका पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. दैनिक जागरणचे पत्रकार विमल कुमार यादव असे मृताचे नाव आहे. आज त्यांच्या राहत्या घरी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

घटनेचा तपशील सुरु

स्थानिक वृत्तानुसार, मृत पत्रकाराची हत्या अररियाच्या राणीगंज येथील प्रेम नगर येथील राहत्या घरी करण्यात आली. हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांना घराबाहेर बोलावले. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडून ते घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे विमलच्या कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळले आहे. विमल त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता.