Manmohan Singh: 'खरा राजकारणी'! जो बिडेन, फर्स्ट लेडी जिल यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली

"खरे राजकारणी", "दयाळू आणि नम्र" व्यक्ती म्हणून मनमोहन सिंग यांचा गौरव केला.

Photo Credit- X

Manmohan Singh: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झालं (Former Prime Minister Manmohan Singh) आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना आज संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यांनंतर रात्री 9 वाजून 51 मिनिटांनी त्यांचे निधन झाल्याची अधिकृत माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. यामुळे भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असे त्यांना मानले जाते. (Dr Manmohan Singh Funeral: डॉ. मनमोहन सिंह पंचत्त्वात विलीन; शीख धर्मीय संस्कारांनुसार मुखाग्नी)

व्हाईट हाऊसच्या निवेदनात बायडेन(Joe Biden) यांनी म्हटले की, 'जिल आणि मी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहोत. सिंग यांना त्यांचे जीवन समर्पित करण्याच्या दृष्टीकोनासाठी आम्ही पुन्हा वचनबद्ध आहोत. आज अमेरिका आणि भारत यांच्यातील अभूतपूर्व पातळीवरील सहकार्य माजी पंतप्रधानांच्या धोरणात्मक दृष्टी आणि राजकीय धैर्याशिवाय शक्य झाले नसते. यूएस-भारत नागरी आण्विक कराराला पुढे नेण्यापासून ते इंडो-पॅसिफिक भागीदारांमध्ये प्रथम क्वाड लाँच करण्यात मदत करण्यापर्यंत, त्यांनी प्रगती दर्शविली. जी आपल्या देशांना आणि जगाला पुढील पिढ्यांसाठी मजबूत करत राहील"

बायडेन पुढे म्हणाले, 'ते खरे राजकारणी होते, एक समर्पित लोकसेवक होते, एक दयाळू आणि नम्र मनुष्य होते." मनमोहन सिंग यांच्याशी झालेल्या संभाषणाची आठवण बायडेन यांनी करून दिली. 2008 आणि 2009 मधील त्यांच्या भेटी दरम्यान दोघांमधील मैत्रीपूर्ण संबंध वाटले. 2013 मध्ये अमेरिका-भारत संबंध हा जगातील सर्वात महत्त्वाचा मद्दा होता. दोन्ही देश जगाचे एक चांगले भविष्य घडवू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

बायडेन म्हणाले, "त्यांनी 2013 मध्ये नवी दिल्लीत माझेही यजमानपद केले होते. तेव्हा आम्ही चर्चा केल्याप्रमाणे, अमेरिका-भारत संबंध हे जगातील सर्वात महत्त्वाचे नाते आहे. आणि भागीदार आणि मित्र या नात्याने, "आपले देश एक भविष्य उघडू शकतात. आमच्या सर्व लोकांसाठी सन्मान आणि अमर्याद क्षमता. मनमोहन सिंग यांनी ज्या दृष्टीकोनासाठी आपले जीवन समर्पित केले. त्या दृष्टीकोनाचा सन्मान करण्याचे वचन अमेरिकेच्या अध्यक्षांनी दिले. त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कुटुंबासाठी संवेदना व्यक्त केल्या.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. सर्वच स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.