राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान

संवेदशील ठिकाणी अप्रिय घटना टाळण्यासाठी मतदान काळात इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे. तसेच, काही ठिकाणी बॅरिकेटींग करण्यात आले असून, सीसीटीव्हीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये मतदान करताना नागरिक (Photo credit: ANI)

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर महानगरपालिका निवडणुसाठी आज (सोमवार, ८ ऑक्टोबर) मतदान पार पडत आहे. जम्मू-काश्मीरमधील एकूण स्थिती पाहता मतदान सुरळीत पार पडावे यासाठी कडेकोठ बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महानगरपालिकेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदानाचा हा पहिला टप्पा आहे. महापालिका निवडणुकीआधी विविध दहशतवादी संघटनांकडून दहशतवादी घटना घडविण्याबद्दल धमक्या आल्या होत्या. त्यामुळे तपास यंत्रणांनी घेतलेल्या आढाव्यानंतर सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी सुरक्षेसाठी चोख तयारी केली आहे.

अत्याधुनिक यंत्रणेचा वापर

संवेदशील ठिकाणी अप्रिय घटना टाळण्यासाठी मतदान काळात इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे. तसेच, काही ठिकाणी बॅरिकेटींग करण्यात आले असून, सीसीटीव्हीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. येणाजाणाऱ्या छोट्या मोठ्या वाहनांची तपासणीही अत्यंत बारकाईने केली जात आहे. सोमवारी जम्मू आणि लडाकसह संवेदनशील समजल्या जाणाऱ्या दक्षिण काश्मीर मधील चार जिल्ह्यात मतदान होईल. ज्या ठिकाणी मतदान पार पडणार आहे. त्या ठिकाणी गुप्तचर यंत्रणांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी उपकरणे वापरली आहेत. जेणेकरून हल्लेखोर आणि मतदानात अडथळा आणणाऱ्या समाजकंटकांवर बारिक नजर ठेवणे सोपे जाईल.

पहिल्या टप्प्यात मतदान पार पडत असलेली महापालिका ठिकाणे

जम्मू, श्रीनगर, अनंतनाग, बारामुला, शोपियां आणि पुलवामा इत्यादी ठिकाणी मतदान पार पडत आहे. तर, काश्मीर खोऱ्यात कुपवाडा, हंदवाडा, बांदीपोला, बारामुला, चाडूरा, बडगाम, खानसाहिब, अचबल, देवसर, कोकरनाग, काजीगुंड आणि कलगाम. तसेच, जम्मू येथील - निश्नाह, अरनिया आरएस पुरा, अखूनर, खोर, ज्यूरियन, राजौरी, थानामांडी, सौशेरा, कालाकोटा, सुंदरबनी, पुंछ, आणि सरनकोट या ठिकाणीही मतदान होणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

SC On Blind Candidates Appointed to Judicial Services: दृष्टिहीन उमेदवार जिल्हा न्यायपालिकेत नियुक्तीसाठी पात्र ठरणार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Kane Williamson: केन विल्यमसनने एकदिवसीय सामन्यात रचला विक्रम; रॉस टेलरला मागे टाकत भारताविरुद्ध सर्वाधिका 50 पेक्षा जास्त धावा करणारा ठरला खेळाडू

Stock Market Fraud: शेअर बाजारातील फसवणूक प्रकरणी विशेष न्यायालयाने दिले माधवी पुरी बुच आणि इतर 5 जणांविरुद्ध FIR दाखल करण्याचे निर्देश

MP News: मालकाचा जीव वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत श्वानाने दिली वाघाशी झुंज, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक

Share Now