झारखंड : JDU ला मोठा झटका, अध्यक्ष जलेश्वर महतो यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
त्यातच जनता दल युनायटेड (JDU) पक्षातील जलेश्वर महतो यांनी काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला आहे.
लोकसभा निवडणुकी पूर्वी राजकीय पक्षांतर सुरु झाले आहे. त्यातच जनता दल युनायटेड (JDU) पक्षातील जलेश्वर महतो यांनी काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला आहे. झारखंड जनता दलाचे अध्यक्ष आणि राज्याचे पूर्व कॅबिनेट मंत्री जलेश्वर महतो यांनी शनिवारी काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली आहे. महतो यांच्या निर्णयावर काँग्रेस पक्ष अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
जलेश्वर महतो (Jaleshwar Mahato) यांनी आज राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची दिल्ली काँग्रेस मुख्यालयात भेट घेतली. त्यानंतर महतो हे औपचारिकरित्या पक्षात सामील झाले आहेत. याप्रकरणी राहुल गांधी यांनी महतो सोबतचा एक फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे.
दरम्यान,गीता कोडा यांनी त्यांचा पक्ष जय भारत समानता पार्टीचे विलय काँग्रेसमध्ये केले होते. तर 2 डिसेंबर रोजी जेवीएम किसान मोर्चाचे केंद्रीय अध्यक्ष शिवलाल महतो यांनी ही भाजपमध्ये प्रवेश केला होता.