Jaisalmer Accident: देवीकोट चौकात भरधाव कारचे नियत्रंण सुटल्याने रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना धडक, अपघातात आई मुलासह दोघांचा मृत्यू
या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
Jaisalmer Accident: राजसस्थानच्या जैसलमेर मध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमध्ये बसलेले तरुण मद्यधुंद अवस्थेत होते आणि कार चालवताना रिल्स बनवत होते त्यामुळे अपघात झाल्याची माहिती उपस्थितांनी दिली. ही घटना शुक्रवारी ५ जानेवारीच्या रात्री घडली. जैसलमेरमधील देवीकोट चौकात ही घटना घडली. (हेही वाचा- तेलंगणात ट्रक आणि रिक्षाच्या धडकेत भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव कारचे नियत्रंण सुटल्याने रस्ता ओलांडणाऱ्या दोन पादचाऱ्यांना कार धडकली आणि या धडकेत आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्हॅनला धडक दिली आणि एका गायीला देखील धडक दिली. कार अतिशय वेगाने होती दरम्यान आत बसलेले तरुण हे रिल्स बनवत होते. कारमध्ये चार तरुण होते, त्यापैकी दोघांचा गंभीर जखमांमुळे जागीच मृत्यू झाला आणि इतर दोघे ही गंभीर जखमी झाले आहे.
बाहवानी सिंग आणि रोशन खान, १३ वर्षाचा मनिष, सोबत त्याची आई मेनका अशी मृतांची नावे आहेत. तर भरधाव कारचे नियत्रंण सुटल्याने गायीला धडक दिली याच निष्पाप गायीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिस दाखल होताच रात्री उशिरांपर्यंत पंचनामा केला. या अपघातानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.