IRCTC ने शेअर केला ऑनलाईन तिकीट बुकिंग करून पैसे वाचवण्याचा फंडा; असा होईल फायदा

तिकीट काऊंटरच्या तुलनेत आयआरसीटीसीच्या बेवसाईट irctc.co.in वरुन तिकीट बुक करणे अधिक महाग पडते. या सुविधासाठी आयआरसीटीसी आणि बॅंक दोघेही प्रवाशांकडून स्वतंत्र पैसे आकरतात. आयआरसीटीसीने ऑनलाईन तिकिट बुक करताना पैसे वाचवण्याचा अत्यंत सोपा मार्ग दर्शविला आहे.

Railway | Image used for representational purpose | (Photo Credits: Facebook)

भारतात (India) आयआरसीटीसीच्या (IRCTC) माध्यामातून दररोज लाखो तिकीटांचे व्यवहार केले जातात. तिकीट काऊंटरच्या तुलनेत आयआरसीटीसीच्या बेवसाईट irctc.co.in वरुन तिकीट बुक करणे अधिक महाग पडते. या सुविधासाठी आयआरसीटीसी आणि बॅंक दोघेही प्रवाशांकडून स्वतंत्र पैसे आकरतात. आयआरसीटीसीने ऑनलाईन तिकिट बुक करताना पैसे वाचवण्याचा अत्यंत सोपा मार्ग दर्शविला आहे. याद्वारे ऑनलाइन बुकींग करताना प्रत्येकजण काही पैसे वाचवू शकतो. आयआरसीटीसीने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, जर एखाद्या प्रवाशाने रेल्वेचे तिकिट बुक करताना डेबिट कार्डद्वारे पैसे भरले तर त्याला 'झिरो पेमेंट गेटवे' चा फायदा मिळेल. आयआरसीटीसीचे सर्व बँक व्यवहार शुल्क जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

आयआरसीटीसीचे ट्वीट-

डेबिट कार्डच्या द्वारे पेमेंट केल्यावर कोणताही शुल्क आकारला जाणार नाही, हा नियम फक्त 1 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर वैध असतो. सध्या ऑनलाईन व्यवहारात मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, ऑनलाईन माध्यमातून रेल्वेचे आरक्षित तिकीट बुकिंग करणाऱ्यालाही याचा फायदा मिळणार आहे. यामुळे प्रवाशांटा वेळ आणि पैसे दोघांची बचत होणार आहे. आयआरसीटीसी नेहमी प्रवाशांसाठी नवीन प्लॅटफॉर्म तयार करत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी आयआरसीटीसीने एप्रिल महिन्यात विनाशुल्क तिकीट बुक करण्याची सुविधा दिली होती. त्याचबरोबर डिजटल व्यवहारात वाढ होऊ म्हणून ही सुविधा प्रवाशांच्या समोर आणून ठेवली होती. हे देखील वाचा- पश्चिम रेल्वे मार्गावर आज संध्याकाळी धावणार महिलांसाठी विशेष सीसीटीव्हीयुक्त लोकल

आयआरसीटीसीचे ट्वीट-

भारतीय रेल्वे आयआरसीटीसी माध्यमातून ऑनलाइन तिकीट, सेवानिवृत्त खोली, टूर पॅकेज, सलून चार्टर, महाराजा एक्स्प्रेस, तेजस, पिलग्रीम स्पेशल ट्रेन, केटरिंग सर्व्हिस, रेल नीर इत्यादी महत्वाच्या सेवा प्रवाशांना मिळवता येतात.