EPFO Balance By Missed Call: 'या' नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुम्ही चेक करू शकता तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक; वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घ्यायची असेल तर तुम्ही केवळ एका मिस्ड कॉलच्या आधारे हे जाणून घेऊ शकता.

EPF | (Photo Credits: PTI)

EPFO Balance By Missed Call: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees' Provident Fund) किंवा EPF ही भारत सरकार (Government of India) च्या देखरेखीखाली EPFO ने सुरू केलेली बचत योजना (Savings Scheme) आहे. कर्मचारी आणि नियोक्ता प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या 12% EPF मध्ये योगदान देतात. सर्व ईपीएफ सदस्य त्यांच्या पीएफ खात्यांमध्ये (PF Accounts) प्रवेश करू शकतात. तसेच ईपीएफच्या कार्यालयात जाऊन त्यांची ईपीएफ शिल्लक ऑनलाइन तसेच ऑफलाइन काढू किंवा तपासू शकतात.

EPFO प्रत्येक सदस्याला UAN म्हणून ओळखला जाणारा 12-अंकी क्रमांक देते. जेव्हा एखादा कर्मचारी त्याची नोकरी किंवा नियोक्ता बदलतो. तेव्हाही त्याचा/तिचा UAN तोच (पूर्वीचाचं) राहतो. तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घ्यायची असेल तर तुम्ही केवळ एका मिस्ड कॉलच्या आधारे हे जाणून घेऊ शकता. (हेही वाचा - EPFO: खुशखबर! EPS अंतर्गत उच्च पेन्शन प्राप्त करण्याची संधी; नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, जाणून घ्या पात्रता व अंतिम मुदत)

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या तुमच्या EPFO खात्यातील शिल्लक -

UAN पोर्टलवर नोंदणीकृत EPF सदस्य त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 9966044425 वर मिस कॉल देऊन EPFO कडे उपलब्ध त्यांच्या खात्याचा तपशील मिळवू शकतात. जर सभासदाचा UAN बँक A/C क्रमांक, आधार आणि पॅन यांपैकी कोणत्याही एका क्रमांकासह असेल, तर सदस्याला शेवटचे योगदान आणि पीएफ शिल्लक यांचा तपशील मिळेल.

मिस्ड कॉल सुविधेचा लाभ घेण्यासाठी 'हे' तपासा -

युनिफाइड पोर्टलवर मोबाइल नंबर UAN सह सक्रिय करणे आवश्यक आहे.

सदस्याकडे खालीलपैकी कोणतेही एक केवायसी UAN- बँक खाते क्रमांक, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड उपलब्ध असणे आवश्यक आहे. (हेही वाचा - New Cheque Bounce Rules: सावधान! चेक बाऊन्स प्रकरणी सरकार कठोर नियण बनवण्याच्या तयारीत)

मिस्ड कॉल देऊन 'असा' तपासा बॅलन्स -

  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 9966044425 वर मिस्ड कॉल द्या
  • दोन रिंग झाल्यानंतर कॉल आपोआप डिस्कनेक्ट होतो.
  • या सेवेचा लाभ घेण्यासाठी सदस्याला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

दरम्यान, EPFO ने ग्राहकांना उच्च पेन्शनची निवड करण्याची अंतिम मुदत 3 मे पर्यंत वाढवली. यापूर्वी, EPS अंतर्गत उच्च पेन्शनसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 3 मार्च 2023 होती. 8,000 हून अधिक सदस्यांनी आधीच उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज केले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now