World Population Day 2022 : आज जागतिक लोकसंख्या दिवस, जाणून घ्या लोकसंख्येत भारत जगात कितव्या क्रमांकावर

संयुक्त राष्ट्र संघाच्या (United Nation) तत्कालीन गव्हर्निंग कौन्सिलने 1989 मध्ये त्याची स्थापना केली होती. 11 जुलै 1990 रोजी हा दिवस पहिल्यांदा 90 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये साजरा करण्यात आला. त्यानंतर जागतिक लोकसंख्या दिवस हा जगभरात साजरा करण्यात येतो.

Population | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

जगातील वाढत्या लोकसंख्येबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस (World Population Day) साजरा करतात. वाढती लोकसंख्या हे संपूर्ण जगापूढे एक मोठं आव्हान आहे. त्यात भारतासारख्या देशासाठी तर ही मोठी चिंतेंची बाब आहे. जागतिक लोकसंख्येच्या यादीत भारत (India) जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळेच भारताला भुकमरी, बेरोजगारी, वैद्यकीय समस्यांसारख्या अनेक संकटांना समोर जावं लागत आहे. भारताची वाढती लोकसंख्या ही भारताच्या मोठ्या समस्यांपैकी एक आहे. तरी यावर वेळीच उपाय करणं गरजेच आहे.

 

गेल्या 32 वर्षापासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाच्या (United Nation) तत्कालीन गव्हर्निंग कौन्सिलने 1989 मध्ये त्याची स्थापना केली होती. 11 जुलै 1990 रोजी हा दिवस पहिल्यांदा 90 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये साजरा करण्यात आला. त्यानंतर जागतिक लोकसंख्या दिवस हा जगभरात साजरा करण्यात येतो.जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यासाठी सुमारे 8 उद्दिष्टे आहेत. तसेच हा दिवस साजरा करत असताना दरवर्षी या दिवसाची विशेष अशी थीम (Theme) ठरवल्या जाते आणि त्या थीमनुसार हा दिवस साजरा केला जातो. या वर्षीची थीम 8 अब्जाची थीम अशी आहे. ज्यानुसार भविष्यात 8 अब्ज लोकांना समान अधिकारी आणि समान संधी दर्शवण्याची संकल्पना आहे.  (हे ही वाचा:-Maharashtra Politics : शिंदे सरकारच्या भवितव्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी)

 

वाढत्या लोकसंख्येच परिणाम संपूर्ण जगात बघायला मिळत आहेत. तरी लोकसंख्येवर शक्य तेवढ नियंत्रण ठेवण्याच आव्हान संयुक्त राष्ट्र संघाकडून जगातील विविध देशांना करण्यात आलं आहे. भारताने तर वाढती लोकसंख्या हा विषय अति गंभीरतेने घेणे गरजेचं आहे. कारण आज भारत ज्या काही संकटांना समोर जात आहे त्यापैकी 40 टक्के गोष्टींना कारणीभूत देशाची वाढती लोकसंख्या आहे.