Voter ID Card: घरबसल्या मागवा मतदान ओळखपत्र, जाणून घ्या काय करावे लागेल?

लोकशाहीने दिलेला अधिकार बजावण्यापलीकडेही या डॉक्युमेंट्सची एक महत्त्वाची ओळख आहे. पण, महत्त्वाचे असे की, मतदान ओळखपत्र (Voter Identity Card) तुम्हाला तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही वयाची 18 वर्षे पूर्ण करता.

Voter ID Card | (File Photo)

मतदान ओळखपत्र (Voter ID Card) हे एक महत्त्वाचे आणि आवश्यक कागदपत्र. लोकशाहीने दिलेला अधिकार बजावण्यापलीकडेही या डॉक्युमेंट्सची एक महत्त्वाची ओळख आहे. पण, महत्त्वाचे असे की, मतदान ओळखपत्र (Voter Identity Card) तुम्हाला तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही वयाची 18 वर्षे पूर्ण करता. असे हे महत्त्वाचे ओळखपत्र जर तुमच्याकडून गहाळ झाले असेल किंवा तुम्हाला ते नव्याने काढून (Voter Identity Card Online) हवे असेल तर तुम्ही ते घरबसल्याही मागवू शकता. होय, हे शक्य आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला काही प्रक्रिया पार पाढावी लागते. एक अर्ज करावा लागतो. जाणून घ्या या संपूर्ण प्रक्रियेविषयी.

मतदान ओळखपत्राची आवश्यकता

मतदान ओळख पत्र हे केवळ मतदान करतानच नव्हे तर सरकारी किंवा खासगी नोकरी, बँकेचे व्यवहार, खरेदी-विक्री व्यवहार याशविाय मोबाईल सीमकार्ड अथवा इतर काही आवश्यक सेवा घेतानाही महत्त्वाचे ठरते. त्यामुळे इतर अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक म्हणून याकडे पाहिले जाते.

मतदान ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करा

तुम्हाला जर नवे मतदान ओळखपत्र हवे असेल तर त्याआधी ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल. त्यासाठी एनरोलमेंट प्रोसेस पार पाडावी लागते. सुरुवातील आपल्याला इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया (Election commission of India) च्या अधिकृत संकेतस्थळाला भट द्यावी लागेल. ज्यावर या प्रक्रियेसंबंधी संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

नव्याने मतदान ओळखपत्रासाठी अप्लाय करायचे असेल तर आपल्याला प्रथम Form 6 निवडावा लाेल. फॉर्म सर्च केल्यानंतर आपल्याला निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाच्या होमपेजवर 'नॅशनल वोटर्स सर्विस पोर्टल' निवडावे लागेल. त्यात 'नेशनल सर्विस' section अंतर्गत नवे वोटर आयडी कार्ड या ऑप्शनसाठी 'Apply Online' वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्ही ऑनलाइन अॅप्लीकेशन फॉर्म पाहायला मिळेल.

मतदान ओळखपत्रासाठी खालील गोष्टी करा

तुमचे अप्लिकेशन योग्य पद्धतीने सबमीट झाल्यानंतर आपण दाखल केलेल्या इमेल आयडीवर एक Email येईल. या Email वर पर्सनल वोटर आयडीच्या पेजची लिंक असेल. यावर जाऊन आपण आपले अॅप्लिकेशन ट्रॅक करु शकता. साधारण एक महिन्यात आपले मतदान ओळखपत्र आपल्या घरी येऊ शकेल.