e-Aadhaar Card आता कधीही आणि कुठेही डाऊनलोड करण्याची सोय; UIDAI ने शेअर केली 'ही' डिरेक्ट लिंक

यावर तुम्हांला नेहमीचं आधारकार्ड डाऊनलोड करण्याची किंवा मास्क आधारकार्ड डाऊनलोड करण्याच्या दोन्ही पर्यायांची सोय आहे.

Aadhaar Card (Photo Credits: PTI)

अनेक लहान सहान कामांमध्ये भारातीयांना आधार कार्ड विचारलं जातं. त्यामुळे आता कधीही आणि कुठूनही ई आधार कार्ड डाऊनलोड करण्याची प्रक्रिया भारत सरकार कडून आता अधिक सुलभ करण्यात आली आहे. The Unique Identification Authority of India (UIDAI) कडून नुकतीच एक ऑनलाईन लिंक शेअर करण्यात आली आहे. त्यावर तुम्हांला आधार कार्ड सहज डाऊनलोड करता येऊ शकते. याकरिता तुम्हांला केवळ तुमचा 12 अंकी आधार क्रमांक माहित असणं आवश्यक आहे. eaadhaar.uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तुम्ही ते सहज डाऊनलोड देखील करू शकता. (नक्की वाचा: Aadhaar Card for Newborn: तुमच्या नवजात बालकाचं आधार कार्ड अवघ्या 2 कागदपत्रांच्या मदतीने uidai.gov.in वर अप्लाय कसं कराल? ‌‌)

UIDAI कडून त्यांच्या ट्वीटर अकाऊंट द्वारा ही ऑनलाईन लिंक शेअर करण्यात आली आहे. यावर तुम्हांला नेहमीचं आधारकार्ड डाऊनलोड करण्याची किंवा मास्क आधारकार्ड डाऊनलोड करण्याच्या दोन्ही पर्यायांची सोय आहे. रेग्युलर आधार कार्ड मध्ये तुम्हांला आधारकार्डावर सारि माहिती दिसणार आहे. तर मास्क्ड वर शेवटचे 4 अंक दिसतील आणि पहिले 8 अंक लपलेले असतील. (Aadhaar Card Update: Face Authentication फीचरचा वापर करून uidai.gov.in वरून आधार कार्ड डाऊनलोड कसं कराल?).

eaadhaar.uidai.gov.in वरून तुमचं आधार कार्ड कसं कराल डाऊनलोड?

भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला त्याचा आधार कार्ड नंबर म्हणून एक खास 12 अंकी क्रमांक मिळतो. आधार कार्ड हे ओळखपत्र आणि वास्तव्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणारे देशातील महत्त्वाचं कागदपत्र आहे.