Pradhan Mantri Ujjwala Yojana अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी आज शेवटचा दिवस; या सोप्या पद्धतीने करा रजिस्ट्रेशन
प्रधानमंत्री उज्जवला योजना (Pradhan Mantri Ujjwala Yojana)अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन घेण्यासाठी आज 30 सप्टेंबर हा शेवटचा दिवस आहे.
प्रधानमंत्री उज्जवला योजना (Pradhan Mantri Ujjwala Yojana)अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन घेण्यासाठी आज 30 सप्टेंबर हा शेवटचा दिवस आहे. दरम्यान Ujjwala Yojana ची वेबसाइट Pmujjwalayojana.com वर जाऊन नगारिकांना मोफत गॅस कनेक्शन घेण्यासाठी अत्यावश्यक माहिती सबमीट करणं गरजेचे आहे. दरम्यान ही योजना 1 मे 2016 साली सुरू करण्यात आली होती. पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालय (Ministry of Petroleum and Natural Gas) कडून ही योजना चालवली जाते. PM Ujjwala Yojana: प्रधानमंत्री उज्जवला योजनेतुन फ्री गॅस सिलेंडर मिळवायची शेवटची संधी; 30 सप्टेंबर पर्यंत कसे कराल बुकिंग?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी PMUY योजने अंतर्गत बीपीएल (BPL) श्रेणीतील कुटुंबीयांना घरगुती गॅस कनेक्शन दिले जाते. ग्रामीण भागात किंवा शहरातही तळहातावर पोट असणार्या अनेक कुटुंबामध्ये चूल पेटवून अन्न बनवलं जातं. मात्र यामुळे महिलांचं आरोग्य आरोग्य धोक्यात येत होतं. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी गरिबांना PMUYअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर्स दिले जातात.
PMUY चा फायदा मिळवण्यासाठी काय कराल?
Pradhan Mantri Ujjwala Yojana चं अधिकृत संकेतस्थळ pmujjwalayojana.com वर क्लिक करा. होम पेजवर तुम्हांला डाउनलोड फॉर्म चा पर्याय दिसेल. त्यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना फॉर्म डाऊनलोड करा. त्यामध्ये अत्यावश्यक माहिती भरल्यानंतर घराजवळ असणार्या एलपीजी केंद्रावर जाऊन सादर करा. त्यासोबत सारी कागदपत्र सादर करा. तुमची सारी कागदपत्र व्हेरिफाय झाल्यानंतर सरकारकडून एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले जाईल.
दरम्यान सबसिडी मिळवण्यासाठी ग्राहकांचे राष्ट्रीय बॅंकेमध्ये अकाऊंट असणं अनिवार्य आहे. महिन्यांप्रमाणे जसे गॅस सिलेंडर अॅडजस्ट केले जातील तसे त्याचे पैसे रिफंड केले जातात.