21-26 डिसेंबर दरम्यान बॅंका राहणार बंद, गैरसोय टाळण्यासाठी आजच करा 'ही' कामं!
23 डिसेंबरला रविवार असल्याने बँका बंद राहतील आणि 25 डिसेंबरला नाताळची सुट्टी असल्याने तुमचं बॅंकेमध्ये काम होणार नाही.
Strikes, Public Holidays to hit banking operations from 21-26 December 2018: 20 डिसेंबर म्हणजे आजच्या नंतर पुढील चार दिवसात तुमचं बॅंकेमध्ये एखादं महत्त्वाचं काम असेल तर ते आजच उरकून घ्या कारण पुढील 3-4 दिवस बॅंका बंदा राहणार आहेत. ख्रिसमसची (Christmas ) सुट्टी, चौथा शनिवार आणि बॅंकांचा संप (Strike) या कारणामुळे पुढचे काही दिवस तुमचं बॅंकेचं काम रेंगाळू शकतं.
21 आणि 26 डिसेंबरला बॅंकांच्या संपामुळे कामबंद राहणार आहे तर 22 डिसेंबरला चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी आहे. 23 डिसेंबरला रविवार असल्याने बँका बंद राहतील आणि 25 डिसेंबरला नाताळची सुट्टी असल्याने तुमचं बॅंकेमध्ये काम होणार नाही. दरम्यान केवळ सोमवारी म्हणजे 24 डिसेंबरला बॅंकाचं काम सुरू राहिल. पण सलग इतके दिवस कामबंद राहिल्याने त्यादिवशीदेखील अनेक बॅंकांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. 'या' कारणामुळे बॅंका संप करणार आहेत.
गैरसोय टाळण्यासाठी काय कराल ?
Netbanking च्या सुविधेमुळे आजकाल अनेक कामं घरबसल्या एका क्लिकवर करणं शक्य आहे. ऑनलाईन माध्यमातून व्यवहार करणं या दिवसांमध्ये फायदेशीर आहे. मात्र तुम्हांला रोख पैशाने एखादा व्यवहार करायचा असेल तर ठराविक रक्कमेपर्यंत पैसे ATMs मधून तुम्ही आजच काढून ठेवा.
चेक व्यवहार असेल तर तो आजच पूर्ण होईल याची काळजी घ्या. कारण आज (20 डिसेंबर ) आणि सोमवार (24 डिसेंबर) या दिवशी बॅंकेचं कामकाज सुरू असेल. तुम्ही हे दोन दिवस चुकवल्यास पुढील 2 दिवस तुमच्याकडे वाट पाहण्याशिवाय दुसरे काहीच नसेल.
बॅंकेचं अकाऊंट स्टेटमेंट (bank statement) किंवा नवं चेक बूक (cheque book) हवं असल्यास याची सोय नेट बॅंकिंगवर (Netbanking) करून देण्यात आली आहे.
संपाच्या काळातही बॅंकेचे अधिकारी महत्त्वाचे निर्णय घेऊ किंवा देऊ शकत नाही. पण इंटरनेट बॅंकिंग आणि एटीएम सेवा विस्कळीत होणार नाही याची पुरेशी खबरदारी घेतली जाणार आहे.