New Rules From 1st April 2023: एप्रिलपासून बदलणार 'हे' नियम; गॅस किमती, सोने खरेदीपासून आधार-पॅन लिंकपर्यंत काय बदलणार? जाणून घ्या

चला तर मग हे नियम जाणून घेऊयात...

प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

New Rules From 1st April 2023: मार्च महिना संपत आला आहे. अशा परिस्थितीत एप्रिलपासून काही बदल होणार आहेत. या सर्व बदलांचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर नक्कीच होणार आहे. येत्या महिन्यात काही नवीन नियम जोडले जाणार आहेत का आणि ते तुमची बचत वाढवतील की तुमचा खिसा आणखी रिकामा करतील हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. चला तर मग हे नियम जाणून घेऊयात...

एप्रिलमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका -

चालू आर्थिक वर्ष (2022-23) 31 मार्च रोजी संपत असून नवीन आर्थिक वर्ष (2023-24) 1 एप्रिलपासून सुरू होत असताना, काही मोठे बदल अंमलात येतील. हे बदल थेट पैसे आणि बँकांशी संबंधित आहेत, त्यामुळे सर्व बँक ग्राहकांना एप्रिल 2023 मध्ये किती बँक सुट्ट्या असतील हे माहित असले पाहिजे. एप्रिल 2023 मध्ये असे 15 दिवस आहेत जेव्हा अनेक खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका शनिवार व रविवारसह बँकांच्या सुट्ट्यांमुळे बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एप्रिल 2023 मध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार यासह 15 दिवस बँका बंद राहतील. (हेही वाचा - नोकरदार लोकांसाठी या आहेत '6' Tax Saving Investments,इन्कम टॅक्स वाचवायला होईल मदत)

सोने खरेदी करण्याच्या पद्धतीत बदल -

1 एप्रिलपासून सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींच्या विक्रीला सहा अंकी अल्फान्यूमेरिक HUID (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) शिवाय परवानगी दिली जाणार नाही. 1 एप्रिल 2023 पासून फक्त सोन्याचे दागिने HUID सोबत विकण्याची परवानगी दिली जाईल.

पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर वाढू शकतात -

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलचे गॅस सिलिंडरचे नवे दर जारी करतात. त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात मार्चमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्याचवेळी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 350 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता एप्रिलच्या पहिल्या तारखेला सरकार गॅसच्या दरात बदल करू शकते.

पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत -

आयकर विभागाने पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. सरकारच्या सल्ल्यानुसार, 31 मार्च 2023 पूर्वी दोन्ही ओळखपत्रे लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल. लोकांना आयकर रिटर्न भरण्यापासून किंवा पॅनशी संबंधित सेवांमध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित केले जाईल. 1 एप्रिल 2023 पासून, अनलिंक केलेला पॅन निष्क्रिय होईल.

7.5 लाख उत्पन्न करमुक्त असेल -

अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय प्रस्तावानुसार, आतापासून देशातील नवीन कर प्रणाली अंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. त्याच वेळी, नवीन कर प्रणालीमध्ये, 50,000 रुपयांच्या मानक कपातीचा लाभ उपलब्ध होईल. अशा प्रकारे, सामान्य माणसाचे 7.5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न आयकरमुक्त असेल.

वाहने होतील महाग -

पुढील महिन्यात वाहनांची किंमत वाढवू शकतात. Hero MotoCorp ने देखील आपल्या टू-व्हीलर मॉडेल्सच्या किमती 2 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे.