Rule Change From 1st May: LPG Cylinder पासून Saving Account मध्ये झाले 'हे' मोठे बदल; तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम

आजपासून अनेक नियम बदलले आहेत. या नियमांमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. वास्तविक, आजपासून एलपीजी सिलेंडरची किंमत आणि बचत खात्याशी संबंधित अनेक नियम बदलले आहेत. आजपासून कोणते आर्थिक नियम बदलले आहेत, ते जाणून घेऊयात.

प्रतिकात्मक फोटो | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

Rule Change From 1st May: दरमहिन्याच्या पहिल्या दिवसापासून अनेक नवीन बदल घडतात. अनेक आर्थिक नियमांमुळे अनेक गोष्टींच्या किमतीही बदलतात. या बदलांचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. आजपासून मे महिना सुरू झाला आहे. आजपासून अनेक नियम बदलले आहेत. या नियमांमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. वास्तविक, आजपासून एलपीजी सिलेंडरची किंमत (LPG Cylinder Price) आणि बचत खात्याशी संबंधित अनेक नियम बदलले आहेत. आजपासून कोणते आर्थिक नियम बदलले आहेत, ते जाणून घेऊयात.

एलपीजी सिलेंडरची किंमत -

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमती अपडेट करतात. आजही त्यांचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. यावेळी सिलिंडरचे दर 19 रुपयांनी कमी झाले आहेत. सलग दुसऱ्या महिन्यात ही कपात झाली आहे. मात्र, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, सिलिंडरच्या कपातीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. या कपातीनंतर बाहेरील खाद्यपदार्थांच्या किमतीही कमी होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा -LPG Cylinder Price Rate: लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलासा; एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात, नवीन किमती जाहीर)

एचडीएफसी बँक एफडी -

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेने सिनियर सिटीझन केअर एफडीमध्ये गुंतवणुकीची मुदत वाढवली आहे. आता यामध्ये 10 मे 2024 पर्यंत गुंतवणूक करता येईल. या एफडीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजाचा लाभ मिळतो.

बचत खाते शुल्क -

जर तुमचे बचत खाते ICICI बँक आणि येस बँकेत असेल तर आजपासून या बँकांच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. ICICI बँकेने चेकबुक, IMPS व्यवहार, स्टॉप पेमेंट चार्जेसमध्ये सुधारणा केल्या आहेत. त्याच वेळी, बँकेने डेबिट कार्डवरील वार्षिक शुल्क शहरी भागासाठी 200 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 99 रुपये केले आहे.

तसेच येस बँकेने बचत खात्यातील किमान सरासरी शिल्लक शुल्क बदलले आहे. आता प्रो मॅक्स बचत खात्यात किमान सरासरी शिल्लक 50,000 रुपये आहे आणि कमाल शुल्क 1,000 रुपये आहे. त्याचप्रमाणे, प्रो प्लस खात्यातील किमान सरासरी शिल्लक रुपये 25,000 आहे. या खात्यात कमाल शुल्क 750 रुपये आहे. त्याचप्रमाणे इतर बचत खात्यांच्या किमान सरासरी शिल्लकमध्येही बदल करण्यात आला आहे. येस बँकेच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही तपासू शकता.

क्रेडीट कार्ड -

आजपासून, बँक क्रेडिट कार्डद्वारे युटिलिटी बिल पेमेंटवर 1 टक्के अतिरिक्त शुल्क आकारेल. IDFC फर्स्ट बँकेने एप्रिलमध्येच जाहीर केले होते की ते क्रेडिट कार्डवरील युटिलिटी बिल पेमेंटवर अतिरिक्त 1 टक्के शुल्क आकारेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now