Solar Eclipse 2022: दिवाळीला होणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण; काय आहे ग्रहण-सुतक काळ आणि त्यामागची पौराणिक कथा, जाणून घ्या
मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होणार आहे.
Solar Eclipse 2022: यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse) 25 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. कार्तिक अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. अमावस्या तिथीबद्दल बोलायचे झाले तर ती 24-25 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी राहील. अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 05:27 वाजता सुरू होत आहे जी 25 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 04:18 पर्यंत चालेल. मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होणार आहे.
हे ग्रहण आंशिक सूर्यग्रहण आहे जे 2022 चे दुसरे सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण प्रामुख्याने युरोप, ईशान्य आफ्रिका आणि पश्चिम आशियाच्या काही भागातून दिसणार आहे. भारतात हे ग्रहण नवी दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, उज्जैन, वाराणसी, मथुरा येथे दिसणार असून, हे सूर्यग्रहण पूर्व भारत वगळता संपूर्ण भारतात पाहता येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Diwali Bonus For Railway Employees: खुशखबर! केंद्र सरकारचे रेल्वे कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट; दिवाळी बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा वाढीव पगार)
या ग्रहणाचा काही राशींवर चांगला तर काही राशींवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. ग्रहण वेळ काय आहे? सुतक कालावधी किती आहे? ग्रहण काळात कोणती काळजी घ्यावी? याबद्दल जाणून घ्या.
सूर्यग्रहण म्हणजे काय?
सूर्यग्रहण ही एक भौगोलिक घटना आहे जी सहसा उघड्या डोळ्यांनी पाहिली जात नाही. वास्तविक, पृथ्वीसह अनेक ग्रह सूर्याभोवती फिरतात. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे आणि तो पृथ्वीच्या कक्षेत फिरत राहतो. पण कधी कधी अशी परिस्थिती असते की चंद्र मध्यभागी आल्याने सूर्याचा प्रकाश थेट पृथ्वीवर पोहोचत नाही. या घटनेला सूर्यग्रहण म्हणतात.
आंशिक सूर्यग्रहण म्हणजे काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अमावास्येच्या दिवशी आंशिक सूर्यग्रहण आकारात येते. आंशिक सूर्यग्रहण याला कंकणाकृती सूर्यग्रहण असेही म्हणतात. असे म्हटले जाते की, या ग्रहणादरम्यान सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर जास्त होते, त्यामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यापूर्वी चंद्र मध्यभागी येतो आणि सूर्याचा काही भागच दिसतो. याला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात.
सूर्यग्रहण वेळ -
भारतीय वेळेनुसार, सूर्यग्रहण मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:29 ते 5.30 वाजून 1 तास 14 मिनिटांपर्यंत असेल. असेही सांगितले जात आहे की, सूर्यास्तानंतर हे ग्रहण संध्याकाळी 05:43 वाजता पूर्ण होईल.
ग्रहणापूर्वीचे सुतक आणि सुतक कालावधी किती आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रहणाच्या आधीचा काळ अशुभ मानला जातो आणि त्याला सुतक काळ म्हणतात. सुतक काळात कोणतेही मांगलिक कार्य केले जात नाही तसेच या काळात कोणत्याही व्यक्तीने नवीन कार्य सुरू करू नये. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी 12 तास आधी सुरू होतो आणि ग्रहण संपल्यानंतरच संपतो.
असे म्हणतात की, ग्रहण कुठेही दिसत नसेल तर सुतक काळ लागत नाही. या वेळी भारतात आंशिक सूर्यग्रहण दिसणार आहे, त्यामुळे सुतक वैध असेल. आंशिक सूर्यग्रहणाचे सुतक पहाटे 03:17 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 05:43 वाजता समाप्त होईल.
ग्रहण आख्यायिका -
हिंदू पौराणिक कथेनुसार ग्रहण राहु आणि केतू या ग्रहांशी संबंधित आहे. असे म्हणतात की समुद्रमंथनाच्या वेळी अमृताने भरलेल्या कलशासाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले होते. तेव्हा त्या युद्धात राक्षसांचा विजय झाला आणि राक्षस कलशांसह अधोलोकात गेले. तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी अप्सरेचे रूप धारण केले आणि असुरांकडून तो अमृत कलश घेतला. यानंतर जेव्हा भगवान विष्णू देवतांना अमृत देऊ लागले, तेव्हा स्वरभानू नावाच्या राक्षसाने कपटाने ते अमृत प्यायले होते आणि देवांना याची माहिती मिळताच त्यांनी भगवान विष्णूंना याबद्दल सांगितले. यानंतर भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्याचे डोके सोंडेपासून वेगळे केले.