Train Coach Booking for Marriage: आता वऱ्हाडी घेऊन जाण्यासाठी संपूर्ण ट्रेन बुक करता येणार; 'इतका' येईल खर्च
तुम्हाला प्रत्येक तिकिटावर 30 टक्के जास्त पैसे द्यावे लागतील.
Train Coach Booking for Marriage: हिंदू धर्मात लग्न हा सोळावा संस्कार समजला जातो. लग्नाचा कार्यक्रम हा सर्वांच्या आयुष्यातला मोठा प्रसंग असतो. यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारची तयारी करतात. या समारंभादरम्यान संपूर्ण थाटामाटात मिरवणूक काढली जाते. अशा परिस्थितीत कधी-कधी दुसऱ्या शहरात जाऊन लग्न करावे लागते. यासाठी लोक कार, बस इत्यादी वाहने बुक करतात. मात्र आता तुम्ही वऱ्हाडी येण्यासाठी ट्रेन बुक करू शकता. भारतीय रेल्वे तुम्हाला विशेष ट्रेनचा डबा बुक करण्याची सुविधा देते आहे.
भारतीय रेल्वेच्या या सुविधेचा तुम्ही लग्न, तीर्थयात्रा, ऑफिस टूर किंवा शाळा कॉलेज पिकनिकसाठी लाभ घेऊ शकता. आता तुम्हाला एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याची चिंता करावी लागणार नाही. रेल्वेकडून ग्रुप तिकीट बुकिंगशी संबंधित प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, संपूर्ण ट्रेन बुक करणे खूप सोपे झाले आहे. प्रवासी हे बुकिंग त्यांच्या जवळच्या रेल्वे स्टेशनवरूनच करू शकतात. (वाचा - Meerut Train Fire: सहारनपूरहून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला आग, इंजिनसह 2 डब्बे जळून खाक)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या निमित्ताने ट्रेन बुक करण्यासाठी तुम्हाला IRCTC वेबसाइटवर जावे लागेल. तुम्हाला प्रत्येक तिकिटावर 30 टक्के जास्त पैसे द्यावे लागतील. याशिवाय, रेल्वेला निश्चित रक्कम एकरकमी जमा करावी लागेल, जी तुमचा प्रवास पूर्ण झाल्यावर परत केली जाईल. करासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे पैसे भरावे लागेल. या स्पेशल ट्रेनमध्ये तुम्ही ज्या कोचची मागणी करत आहात त्यानुसार तुम्हाला शुल्क भरावे लागेल.
इतके रुपये खर्च करावे लागतील -
- एका कोचसाठी तुम्हाला 50 हजार रुपये मोजावे लागतील.
- 18 डब्यांच्या ट्रेनसाठी तुम्हाला 1 लाख रुपये मोजावे लागतील.
- याशिवाय अनेक करही लावले जातील.
आवश्यक कागदपत्रे -
- आधार कार्ड
- पॅन क्रमांक
- मोबाईल क्रमांक
- फोटो
अशा प्रकारे वरील सर्व प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही वऱ्हाडी मंडळींना ट्रेनस्वारी करत लग्नाच्या ठिकाणी पोहोचवू शकता. यासाठी तुम्हाला आधी बुकिंग करावे लागेल.