Swiggy Instamart's Best-Selling Product: स्विगी इंस्टामार्ट वर 10 मिनिटांत डिलेव्हरी मिळवण्यासाठी 'या' गोष्टीला सर्वाधिक मागणी!
Sriharsha Majety यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, बेड्शीट्स या स्विगी इंस्टामार्टवरील सध्या टॉप सेलिंग प्रोडक्ट आहेत.
घरातलं रोजचं सामान आणि अत्यावश्यक वस्तूंची घरपोच सेवा देण्यासाठी Swiggy Instamart सुरू झालं. आता लोकांना घरपोच हव्या असलेल्या वस्तूंच्या यादींमध्ये अनेक गोष्टींची भर पडली आहे. यामध्ये इलेक्ट्रोनिक्सच्या वस्तू, स्पोर्ट्स गिअरते क्रॉकरी पर्यंत अनेक गोष्टी आल्या आहे. यात इंस्टामार्ट वर सर्वात जास्त विकली जाणारी गोष्ट कोणती? हे तुम्हांला ठाऊक आहे का? CNBC-TV18's Global Leadership Summit मध्ये CEO Sriharsha Majety यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे.
Sriharsha Majety यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, बेड्शीट्स या स्विगी इंस्टामार्टवरील सध्या टॉप सेलिंग प्रोडक्ट आहेत. सुरूवातीचे दिवस पाहता,ग्राहकांचा अधिक ओढा हा बॅटरीज कडे होता पण आता 10 मिनिटांत लोकांना बेड्शीट्स हव्या असतात.
युजर्सच्या बदलत्या गरजा पाहून अनेक बदल केले जात आहेत. ही शिफ्ट एका व्यापक ट्रेंडचा भाग आहे जिथे ग्राहक झटपट कॉमर्सला पारंपारिक ई-कॉमर्सचा एक सोयीस्कर पर्याय म्हणून पाहतात. "जर यूजर्सना प्लॅटफॉर्मची सवय होत असेल, तर त्यांना अधिकाधिक निवड हवी आहे," असे ते म्हणाले आहेत.
मॅजेटी यांनी instant delivery च्या लॉजिस्टिक मर्यादा मान्य केल्या, ते म्हणाले की ते अद्याप 10 मिनिटांत "संपूर्ण जगाला वितरित करू शकत नाही". भारतातील quick commerce market चे मूल्य आता $5.5 बिलियन पेक्षा जास्त आहे, कंपन्या instant delivery ची मर्यादा ओळखून आहेत.
कंपनीच्या 10 वर्षांच्या प्रवासात नुकताच स्विगीने आयपीओ देखील आणला आहे. 2021 मध्ये सार्वजनिक झालेल्या झोमॅटोशी या सूचीने आपली स्पर्धा तीव्र केली आहे. दोन्ही कंपन्या आता भारताच्या quick commerce sector मध्ये वर्चस्व गाजवण्याच्या प्रयत्नात आहेत.