SBI Increases Interest Rates on Fixed Deposits: स्टेट बँक ऑफ इंडिया मुदत ठेव दर वाढवले, घ्या जाणून

जी आज 27 डिसेंबर 2023 पासून लागू झाली आहे.

SBI FD Rates | (Photo credit: archived, edited, representative image)

SBI FD Rates Latest News: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या मुदत ठेवींवरील (FDs) व्याजदरात वाढ (SBI Hikes Fixed Deposit Rates) लागू केली आहे. जी आज 27 डिसेंबर 2023 पासून लागू झाली आहे. खास करुन ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठेवींचे दर (SBI FD Rates For Senior Citizen) फायदेशीर आहेत. डिसेंबर अखेर म्हणजेच सरत्या वर्षाच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये बँकांच्या दर समायोजनाच्या मालिकेदरम्यान SBI ने हे पाऊल उचलले आहे. सुधारित दर विविध कालावधीसाठी लागू होतात, जे खातेधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी अद्ययावत पर्याय उपलब्ध करुन देतात. आपणही येथे एसबीआय एफडीज विविध गुंतवणुकीचे दर जाणून घेऊ शकता.

एसबीआय मुदत ठेव दरवाढीचा तपशील:

SBI ने विशिष्ट कालावधीसाठी अपवाद वगळता वेगवेगळ्या कालावधीतील FD वर व्याजदर वाढवले आहेत. विशेष म्हणजे. ज्यामध्ये सात दिवसांपासून ते पंचेचाळीस दिवसांत परिपक्व होणाऱ्या ठेवींच्या दरांमध्ये 50 बेसिस पॉइंट्सची (bps) वाढ झाली आहे, आता 3.50% व्याजदर मिळत आहेत. त्याचप्रमाणे, 46 दिवस ते 179 दिवसांच्या मुदतीसह FD मध्ये 25 bps ची वाढ झाली आहे. ज्यामुळे 4.75% व्याजदर मिळू शकतो. बॅंकेने इतर कालावधीसाठी देखील दर समायोजित केले आहेत, मॅच्युरिटी कालावधीवर आधारित विविध परतावा प्रदान करतात. (हेही वाचा, बँक खात्याशिवाय Google Pay वर सुरु करता येईल Fixed Deposit, जाणून घ्या याबद्दल अधिक)

सुधारित SBI FD दर (जेष्ठ नागरिक नसलेले):

ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI FD दर (अतिरिक्त 50 bps):

एक्स पोस्ट

दरम्यान, ही पुनरावृत्ती फेब्रुवारी 2023 पासून SBI च्या FD दरांमध्ये नवीनतम समायोजनाचा विशेष उल्लेख करते. उल्लेखनीय म्हणजे, SBI बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, कोटक महिंद्रा बँक आणि DCB बँक यासारख्या इतर बँकांचे अनुसरण करताना दिसते. या सर्वांनी डिसेंबर 2023 मध्ये मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 8 डिसेंबरच्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीत सलग पाचव्यांदा मुख्य रेपो दर 6.5% राखून ठेवत असताना SBI ने दरवाढ केली आहे.